CoronaVirus health staff and people fled after corona victim died in ambulance
CoronaVirus News: दुर्दैवी! कोरोना बाधितानं रुग्णवाहिकेत प्राण सोडला अन् धक्कादायक प्रकार घडला By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 03:02 PM2020-08-02T15:02:25+5:302020-08-02T15:06:09+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना बाधितांचा आकडा साडे सतरा लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या दररोज देशात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका बाजूला कोरोना रुग्ण जीव गमावत असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. बिहारच्या सुपौलमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना कोरोना बाधितानं प्राण सोडला. सुपौल जिल्ह्यातल्या त्रिवेणीगंजमध्ये कोरोना रुग्ण आढळून आला. त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यामुळे त्याला जिल्ह्यातल्या कोविड रुग्णालयात घेऊन आणण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती. रुग्णवाहिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेवलं. मात्र रुग्णालयात नेलं जात असताना रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णाच्या मृत्यूमुळे रुग्णवाहिकेतील कर्मचारी घाबरले आणि ते रुग्णवाहिका तिथेच टाकून पळून गेले. कोरोना रुग्णाला छातापूर पीएचसीमधून जिल्ह्यातील कोविड सेंटरला आणत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर. पी. सिन्हा यांनी दिली. रुग्णाच्या मृत्यूनंतर आरोग्य कर्मचारी त्याला तिथेच टाकून पळाले. त्यावेळी त्याची पत्नी रुग्णवाहिकेतच बसून होती. तिच्यावर आणखी कोणीही नव्हतं. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर कित्येक तास परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. कोरोना संकट काळात माणुसकीचं नातं संपत असल्याचं अशा अनेक घटनांमधून दिसत आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus