CoronaVirus: दिव्यांच्या प्रकाशात उजळला भारत; मोदींच्या आवाहनाला राजकीय नेत्यांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 09:25 PM2020-04-05T21:25:33+5:302020-04-05T21:58:47+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विजेवरील दिवे बंद करून आपापल्या घरासमोर, गॅलरीत तेल, तुपाचे दिवे, टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते, त्याला देशभरातील राजकीय नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा दिवा पेटवून मोदींच्या आवाहनाला साथ दिली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीसुद्धा दिवा पेटवून मोदींच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही कुटुंबीयांसह दिवे पेटवले आहेत.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंनीही सपत्नीक दिवे लावले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिव्यांतून ओम साकारला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीसुद्धा मेणबत्ती पेटवून मोदींच्या आवाहनाला साथ दिली आहे.

पश्चिम बंगालमधले भाजपा नेते जगदीप धनकर यांनीसुद्धा दिव्यांची रोषणाई केली होती.

अमित शाह यांनीसुद्धा दिवा लावून मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीसुद्धा कुटुंबीयांसह दिवे पेटवले आहेत.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीसुद्धा दिवे पेटवून मोदींना साथ दिली आहे.