CoronaVirus: लॉकडाऊनदरम्यान भारतीय या गोष्टींबाबत गुगलवर करताहेत सर्वाधिक सर्च By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 08:18 PM 2020-04-30T20:18:17+5:30 2020-04-30T20:44:24+5:30
गेल्या सव्वा महिन्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात घरात बसून असलेल्या भारतीयांसाठी त्यांचे स्मार्टफोन आणि इंटरनेट सर्वाधिक आधार ठरले आहेत. या काळात भारतीयांनी गुगलवर काही गोष्टींबाबत सर्वाधिक सर्च केले आहे. याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा येत्या रविवारी संपत आहे. गेल्या सव्वा महिन्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात घरात बसून असलेल्या भारतीयांसाठी त्यांचे स्मार्टफोन आणि इंटरनेट सर्वाधिक आधार ठरले आहेत. या काळात भारतीयांनी गुगलवर काही गोष्टींबाबत सर्वाधिक सर्च केले आहे. याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन सुरुवातीच्या काळात कोरोनाला गांभीर्याने न घेणाऱ्यांनी रुग्णांची संख्या वाढू लागल्यापासून या विषाणूचा धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाबत भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबतही भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले.
कोरोना विषाणू चीनमध्ये सापडलेला कोरोना विषाणू आणि त्याबाबतही अधिकची माहिती घेतली जात आहे.
कोरोना विषाणूला रोखण्याच्या टिप्स कोरोनावर कुठलाही उपचार नसल्याने कोरोनाला रोखण्यासाठीच्या टिप्सबाबत माहिती घेण्यासाठी भारतीयांकडून गुगलवर सर्च केले जात आहे.
लॉकडाऊनमधील वाढ कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का? लॉकडाऊनमधून कुठल्या सेवांना सवलत मिळणार, याबाबत गुगलवर सर्च करून माहिती मिळवली जात आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे या औषधाबाबत गुगलवरून मोठ्या प्रमाणावर माहिती घेतली जात आहे.
कोरोनाची लक्षणे कोरोना विषाणू हा नवीन असल्याने त्याचा संसर्ग झाल्यानंतर दिसून येणाऱ्या प्राथमिक लक्षणांबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. त्यामुळे कोरोनाच्या लक्षणांबाबत गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे.
आरोग्य सेतू अॅप कोरोनाबाबत माहिती आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी आरोग्य सेतू अॅप तयार केले आहे. या अॅपबाबत लोकांकडून गुगलवरून माहिती मिळवली जात आहे
कोविड-१९ ट्रॅकर कोरोना विषाणूची माहिती देणाऱ्या कोविड-१९ ट्रॅकर बाबतही गुगलवरून मोठ्या प्रमाणात माहिती मिळवली जात आहे.
कोरोना विषाणूवरील उपचार मोठ्या प्रमाणात संशोधन होऊनही कोरोनावर अद्याप इलाज सापडलेला नाही. मात्र तरीही कोरोनाबाधितांवर विविध उपचार पद्धतींद्वारे इलाज केला जात आहे. त्यामुळे याबाबत गुगलर मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे.
कोरोना विषाणूशी संबंधित बातम्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने या आजाराबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संबंधीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात सर्च केल्या जात आहेत.