Coronavirus: India's great success in corona testing, Swab Price Brought To One Tenth pnm
Coronavirus: कोरोना टेस्टिंगमध्ये भारताला मोठं यश; फक्त १० दिवसांत शोधला सर्वात ‘स्वस्त’ उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:27 PM2020-05-18T13:27:22+5:302020-05-18T13:31:48+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. जगातील १९० देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत ४७ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. आतापर्यंत ९० हजारांहून जास्त लोकांना कोरोना झाला आहे तर अडीच हजारांपर्यंत लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोना विषाणूच्या लढाईत सर्वात मोठं हत्यार म्हणजे चाचणी, तपासणीमुळे कोरोना संक्रमण कोठे आणि किती प्रमाणात पसरला आहे याची माहिती मिळते. मार्च महिन्यापासून कोरोनाने भारतात शिरकाव केला तेव्हा अधिकाधिक लोकांची चाचणी करण्याचे सरकारसमोर आव्हान होते. कोरोनासाठी संशयिताच्या नाक किंवा घशातून नमुना घेण्यात येत आहे. भारताला चाचण्यांच्या स्वाबचा पुरवठा फारच कमी होता. चीनकडून भारताला १७ रुपये प्रति स्टिक स्वाब आयात करावी लागत असे. मात्र त्यांच्याकडून आयात केलेला मालही चांगल्या दर्जाचा नव्हता. वस्त्र मंत्रालयाने दोन प्रसिद्ध कंपन्यांशी करार केल्यामुळे १० दिवसात यावर उपाय शोधण्यात यश मिळालं आहे. यासाठी जॉन्सन अँन्ड जॉन्सन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची मदत घेण्यात आली आहे. जॉन्सन अँन्ड जॉन्सन इअरबड्स बनवित आहेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने कस्टम मेड पॉलिस्टर स्टेपल्स बनवले आहेत. परिणामी, एका स्वाबची किंमत कमी होऊन १.७० रुपये करण्यात आली. इअरबड्समध्ये सामान्यत: कापूस आणि एक लहान काठी असते. त्याची लांबी वाढविण्यासाठी त्यामध्ये एक एक्सटेंडर लावण्यात आला आहे. आणि रिलायन्सने चाचणीसाठी लॅबमध्ये मंजूर साहित्य पुरविले आहे. या टेस्टिंग स्वाबचं उत्पादन सुरु झालं असून पुणे येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलजी(NIV) ने या टेस्टिंगला साहित्याला हिरवा कंदील दिला आहे. या डिझाइनमध्ये रिलायन्सने कच्चा माल दिला. जॉन्सन आणि जॉन्सन यांनी संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी संसाधने दिली. ६ मेपासून मुंबईतील एका उत्पादकांनी याचं उत्पादन सुरू केले आहे. आता कंपनी नवीन मशीनरी आणत आहे ज्यास यापुढे एक्सटेंडर मॅन्युअल फिटिंगची आवश्यकता नाही. यामुळे खर्च आणखी कमी होईल प्रति स्वाब १ रुपये होईल. अधिकाऱ्यांच्या मते, कंपनी दिवसातून एक लाख चाचणी स्वाब्स उत्पादन करत आहे. तीन आठवड्यांत मशीन ऑटोमेशननंतर दररोज ५ ते ६ लाख स्वाब्स तयार होतील. मागील आठवड्यात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पुढे आणली होती. तेव्हा भारतात पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स, मास्क उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून इतर देशांनाही निर्यात करत असल्याचं सांगितलं होतं. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याभारतcorona virusCoronaVirus Positive NewsIndia