CoronaVirus Indias Single day Recoveries Exceed Fresh Cases as Record 95880 Recuperate
CoronaVirus News: दिलासादायक! कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 04:03 PM2020-09-19T16:03:01+5:302020-09-19T16:11:44+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना बाधितांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेला आहे. देशात दररोज जवळपास ९० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत सध्या जगात दुसऱ्या स्थानी आहे. आता केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. काल दिवसभरात जवळपास ९५ हजार ८८० जणांनी कोरोनावर मात केली. तर ९३ हजार ३३७ जणांना कोरोनाची लागण झाली. म्हणजेच काल कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना बाधितांची संख्या ५३ लाख ८ हजार १४ इतकी आहे. आतापर्यंत ४२ लाख ८ हजार ४३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट ७९.२८ टक्के इतका आहे. या बाबतीत भारतानं अमेरिकेला मागे टाकलं आहे. देशात आतापर्यंत ८५ हजार ६१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील १ हजार २४७ जणांनी काल दिवसभरात प्राण सोडला. कोरोनामुळे असलेला मृत्यूदर सध्या १.६१ टक्क्यांवर आला आहे. तर सध्याच्या घडीला १० लाख १३ हजार ९६४ जणांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग धडकी भरवणारा आहे. ७ ऑगस्टला देशातील कोरोना बाधितांचा आकडा २० लाखांच्या पुढे गेला. त्यानंतर अवघ्या १६ दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली. ५ सप्टेंबरला हाच आकडा ४० लाखांच्या पुढे गेला. १६ सप्टेंबरला देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यानं ५० लाखांचा टप्पा ओलांडला. कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता आता सगळ्यांचंच लक्ष कोरोनावरील लसीकडे लागलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus