Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 12:47 PM2020-04-20T12:47:36+5:302020-04-20T13:09:11+5:30

Coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 15,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळून काळजी घेण्यास सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे.

आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये काही अटींसह या सवलत मिळतील. रेड झोन व बाधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनची बंधने लागू असतील.

राज्याप्रमाणे देशभरातही सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होण्यात मदत होईल.

दिल्ली राज्य सरकारने मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हे निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला आहे. देशभरात आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू असणार हे जाणून घेऊया.

शेतीविषयक कामे, शेती व बागायती कामांसाठी साहित्याची विक्री व उत्पादन, कृषिमाल खरेदी केंद्रे

मत्स्य व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री, पोल्ट्री फार्म, हॅचरीज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्प

बँक शाखा आणि एटीएम, कॅश मॅनेजमेंट एजन्सिज, इन्शुरन्स कंपनी, सहकारी पतसंस्था.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक आणि साठवणूक. दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.

मनरेगा - सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मजुरांना ही कामे करता येतील.

ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगी

पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन व गॅसची वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री

पोस्टल, कुरिअर सेवा, दुरध्वनी, इंटरनेट सेवा

ब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा

50 टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा

कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स