CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना आरोग्यविषयक समस्या; किडनी-लिव्हरवर गंभीर परिणाम, रिपोर्टमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 09:26 AM 2021-07-18T09:26:59+5:30 2021-07-18T09:45:38+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असत असताना अनेक रिसर्च केले जात आहेत. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न केले जात असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक रिसर्च केले जात आहेत. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात येत आहे. अशीच एक धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. भयंकर बाब म्हणजे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होत आहे,. लँसेटच्या रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
लँसेटच्या रिपोर्टने चिंतेत भर टाकली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये काहीनाकाही आरोग्य विषयक समस्या आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
लँसेटच्यावतीने यूकेमध्ये 73197 लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या 49.7 टक्के रुग्णांमध्ये काहीना काही आरोग्यविषयक समस्या या होत्या. तसेच बरं झाल्यावर देखील अशीच परिस्थिती होती.
कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेक लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळाली. कोरोनाचा तरुणांवर अधिक गंभीर परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये विशेष नमूद करण्यात आलं आहे.
19 ते 29 वर्षे वयोगटातील 27 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर देखील ते खूप वेळ आजारी होते. त्यांच्यामध्ये लाँग कोविडची लक्षणं पाहायला मिळाली. त्यामुळेच त्यांच्या शरिरातील अवयवांवर याचा परिणाम झाला आहे.
किडनी आणि लिव्हरवर याचा सर्वात जास्त परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या लोकांमध्ये कार्डियक एरिद्मिया हा आजार आढळून आला आहे. तसेच अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
कोरोनासह दुसऱ्या आजाराचा सामना करत असलेल्या तरुणांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तसेच कोरोनावर आणखी संशोधन झालं पाहिजे असं देखील लँसेटने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे.
सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात दररोज जवळपास दर दीड मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच सध्या लोकांचा निष्काळजीपणा वाढलेला दिसून येत आहे.