Doctors' Day: परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 1500 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:00 PM 2021-07-01T18:00:48+5:30 2021-07-01T18:19:28+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. जग कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही तीन कोटींवर पोहोचली आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून विविध उपाय केले जात आहेत. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या संकटात आतापर्यंत तब्बल 1500 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तब्बल 800 डॉक्टर्सचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 800 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे.
बिहार आणि दिल्लीतील सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर यातील अनेक डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. तर काहींनी एक डोस घेतला होता. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आयएमएचे डॉ. जयेश लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती डॉक्टरांचा मृत्यू झाला यावर रिसर्च सुरू आहे. तसेच यातील किती डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं याचीची माहिती घेण्यात येत आहे.
कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या डॉक्टरांमध्ये तरुण आणि वृद्ध डॉक्टरांचाही समावेश आहे. मात्र तरुण डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. रुग्णांवर उपचार करतानाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती.
डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे.
मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे.
78 देशांच्या GISAID आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, भारत, रशिया, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आपली पकड अधिक मजबूत करत आहे.
डेल्टा व्हेरिएंट बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट हा प्रमुख व्हेरिएंट बनण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.