CoronaVirus Live Updates : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध! कोरोना मृत्यूचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:27 AM 2021-10-02T10:27:27+5:30 2021-10-02T10:56:15+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांचा आकडा हा तीन कोटीच्या वर गेला आहे. तर लाखो लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी संशोधन केलं जात असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत.
जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,354 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चार लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यांच्या मृत्यूची शक्यता अधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळेच त्यांना गंभीर इशारा देण्यात आला आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता ही जवळपास 80 टक्के आहे. तसेच मृत्यूचा धोकाही असतोच. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
संशोधक एशले क्लिफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमचे परिणाम ठामपणे सुचवतात की धूम्रपान हा गंभीर कोविड संसर्ग होण्याच्या जोखमीशी संबंधित आहे आणि ज्याप्रमाणे धूम्रपानामुळे हृदयरोग, विविध कर्करोगाचा धोका संभवतो तशाच पद्धतीने धूम्रपानामुळे कोविड संसर्ग अधिक तीव्र होण्याचा तसंच कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोकाही अधिक आहे."
क्लिफ्ट यांनी म्हणूनच आता सिगारेट सोडणे आणि धूम्रपान न करणं हा एक योग्य निर्णय ठरू शकतो असं देखील म्हटलं आहे. जवळपास 4 लाख 20 हजार लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून कशाप्रकारे धोका असतो हे आता समोर आलं आहे.
यामध्ये स्मोकरचा समावेश होता. यातील 71 टक्के लोक हे दिवसाला एक ते 19 सिगारेट पित असतं. तर 29 टक्के लोक हे एका दिवसात 20 सिगारेट पित असल्याची माहिती मिळत आहे. संशोधकांनी कोरोना चाचणी, रुग्णालयातील डेटा आणि मृत्यू सर्टिफेकेट या सर्वांचा नीट अभ्यास केला आहे.
51 रुग्णालयात 14 हजार स्मोकर्सला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धूम्रपान करणाऱ्यांना कोरोना जवळपास 80 टक्के धोका असतो. त्यामुळे वेळीस सावध होण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनावर मात केल्यानंतर देखील तो रुग्णांचा पाठ सोडत नाही आहे. लोकांना विविध समस्या भेडसावत आहेत. काही लोकांची शुगर वाढत आहेत. तर काहींना थकवा जाणवतोय. तर काहींना श्वास घेताना अडचण येत असून वास घेण्याची क्षमता देखील कमी झाली आहे. अशा तक्रारी या कोरोनाग्रस्तांमध्ये पाहायला मिळत आहेत.
कोरोना रुग्णांचं आता वजन कमी होत असून कुपोषणाचाही सर्वाधिक धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये कुपोषणाची समस्या पाहायला मिळत आहे.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने हा रिसर्च केला आहे. रिसर्चनुसार, जवळपास 30 टक्के कोरोना रुग्णांचं वजन हे पाच टक्क्यांपर्यंत कमी झालं होतं. तर अर्ध्याहून अधिक रुग्णांना कुपोषणाचा सर्वाधिक धोका आहे.
ज्या रुग्णांना याआधी गंभीर स्वरुपात म्युकोरमायसिस म्हणजे ब्लॅक फंगसची लागण झाली होती त्यांच्यामध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आढळून आलं आहे. अनेक कोरोना रुग्णांना थकवा जाणवतं आहे. तसेच अशक्तपणा देखील आला आहे.
काही कोरोनाग्रस्तांना भूक लागत नाही. त्यामुळेच त्याचं वजन देखील वेगाने कमी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच शरीरावर येणाऱ्या सुजेमुळे कुपोषणाचा अधिक धोका असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे.