CoronaVirus Live Updates : ना कोरोनाची चिंता, ना नियमांची भीती! खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी; हलगर्जीपणा ठरेल जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 09:17 AM2021-11-03T09:17:26+5:302021-11-03T09:28:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींच्या टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशभरात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे.

सणासुदीच्या काळात लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. रस्त्यावर लोक मास्क शिवाय देखील फिरताना आढळून येत आहेत. तर काही ठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी तुफान गर्दी केली जात आहे.

कोरोनाच्या संकटात अत्यंत काळजी घेण्याचं आवाहन हे सरकारच्या वतीने केलं जात असताना लोकांचा हलगर्जीपणा पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकंच स्वत:हून नियमाचं पालन न करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत असल्याचं सध्या चित्र आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असलेली पाहायला मिळत आहे. पण असं असलं तरी खरेदीसाठी बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, कानपूर यासारख्या देशातील अनेक छोट्या मोठ्या शहरांत दिवाळीसाठी लोकांनी केलेली गर्दी पाहून त्यांना कोरोनाचा विसर पडल्याचंच म्हणावं लागेल पण त्यांचा हा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.

कोरोना काळात लोकांना वारंवार मास्क लावण्याचं आवाहन केलं जातं पण त्याचं पालन होताना दिसत नाही. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.

डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते असं म्हटलं आहे.

संशोधकांनी सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते.

घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. राजेश भूषण यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे.

कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.

नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.