CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:02 AM 2021-06-12T09:02:16+5:30 2021-06-12T09:35:38+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रगत देश हे कोरोनापुढे हतबल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 17 कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशातच आता मागील काही रिसर्चचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्सचं असं म्हणणं आहे, की कोरोनाचे निरनिराळे व्हेरियंट समोर आल्यानंतर आता कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करणं योग्य ठरेल.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरही वाढवण्यात आलं आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अशातच आता मागील काही रिसर्चचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्सचं असं म्हणणं आहे, की कोरोनाचे निरनिराळे व्हेरियंट समोर आल्यानंतर आता कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करणं योग्य ठरेल.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतरात तातडीने कोणत्याही बदलाची गरज नाही. कोणालाही या बाबतीत घाबरण्याची गरज नाही.
सध्या दोन्ही डोसमधील अंतरात बदल करण्याची गरज पडल्यासही हा निर्णय अत्यंत सावधगिरीनं घेतला जाईल. आपण हे लक्षात ठेवायला हवं, की जेव्हा आपण अंतर वाढवलं, तेव्हा आपल्याला त्या लोकांसाठीच्या धोक्याचा विचार करायचा होता, ज्यांनी केवळ एकच डोस घेतला आहे.
अंतर वाढवण्यामागे मात्र असा उद्देश होता, की अधिकाधिक लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळू शकेल आणि कोरोनाविरोधातील लढ्यात थोडी अधिक मदत मिळेल असं देखील पॉल यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटामध्ये (NTAGI) अशा लोकांचा समावेश आहे जे जागतिक आरोग्य संघटेनच्या पॅनलचा आणि समितीचा हिस्सा होते. याच गटाने लसीच्या दोन डोसमधील अंतराबाबत निर्णय घेणं योग्य ठरेल.
पॉल यांनी सुरुवातीला यूकेनं 12 आठवड्यांचं अंतर ठेवलं होतं. मात्र, आपल्याकडे उपलब्ध आकड्यांनुसार आपल्याला त्यावेळी हे सुरक्षित वाटलं नव्हतं. त्यामुळे, याबाबत कोणताही निर्णय शास्त्रज्ञांकडे सोपवणं आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करणंच योग्य राहील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaxin) आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसींचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. खासगी रुग्णाल कोविशिल्ड या लसीचा प्रति डोसा 780 रूपयांना मिळणार आहे. याममध्ये 600 रूपये लसीची किंमत + 5 टक्के जीएस आणि 150 रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे.
कोवॅक्सिन ही लस 1410 रूपयांना मिळणार असून यामध्ये (1200 रूपये मूळ किंमत+60 रूपये जीएसटी आणि 150 रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर खासगी रुग्णालयात स्पुटनिक व्ही ही लस 1145 रूपये प्रति डोस दरानं देण्यात येईल.
लसीच्या दर ठरवण्यासोबतच दररोज यावर देखरेखही ठेवली जाणार आहे. अधिक रक्कम घेतल्या संबंधित कोविड लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाईल. रुग्णालयांना 150 रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारता येणार नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. यावर आता राज्य सरकारांना देखरेख ठेवावी लागेल.