CoronaVirus Lockdown 2 starts in india know what services will start after 20th april kkg
CoronaVirus: देशात Lockdown 2; जाणून घ्या काय बंद आणि काय सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:47 AM2020-04-15T11:47:15+5:302020-04-15T12:14:30+5:30Join usJoin usNext आंतरजिल्हा, आंतरजिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बंद राहील. यामध्ये मेट्रो, बस सेवेचा समावेश असेल. ३ मेपर्यंत या सेवा बंदच राहतील. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मेपर्यंत सुरू होणार नाहीत. केंद्रीय गृह मंत्रालयानं तसे आदेश दिलेले आहेत. सामजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ३ मेपर्यंत करणार नाही. चित्रपटगृह, मॉल्स, शॉपिंग संकुलं, व्यायामशाळा, क्रीडा संकुलं, तरणतलाव, बार ३ मेपर्यंत बंद राहतील. कृषी, फलोत्पादन, शेतमाल खरेदी, मंडया २० एप्रिलपासून सुरू करण्याची परवानगी गृह मंत्रालयानं दिली आहे. २० एप्रिलपासून कृषीशी संबंधित यंत्रांची दुकानं, यंत्रांच्या सुट्या भागांची विक्री करणारी दुकानं, पुरवठा साखळी, दुरुस्तीची दुकानं सुरू होतील. फार्मास्युटिकल कंपन्यांच्या निर्मिती केंद्रांसोबतच वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय पायाभूत सेवांवर काम करणाऱ्या कंपन्यांची केंद्रंही २० एप्रिलपासून सुरू असतील. महामार्गांवरील ढाबे, ट्रक दुरुस्ती करणारी दुकानं, सरकारी कॉल सेंटर्स २० एप्रिलपासून सुरू होतील. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असेल. अन्नधान्याची दुकानं, फळांची, भाजांची दुकानं, दूधविक्री केंद्रं, पोल्ट्री, मांस आणि मासेविक्री करणारी दुकानं लॉकडाऊन दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन, आयटी रिपेयरिंग, प्लंबर, मोटार मॅकेनिक, सुतार यांच्या सेवा २० एप्रिलपासून सुरू होतील. मात्र या सेवा स्वयंरोजगार स्वरुपातल्या हव्यात. २० एप्रिलपासून देण्यात आलेल्या सवलती कन्टेनमेंट झोन आणि कोरोना हॉटस्पॉट भागात लागू नसतील.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus