CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:59 PM2020-05-04T17:59:03+5:302020-05-04T18:17:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वेगाने वाढत असून तब्बल 35 लाखांच्यावर गेली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे.

भारतासह जगातील अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.

सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 42 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 42 हजार 533 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (4 मे) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असून 11,706 जणांनी लढाई जिंकली आहे. जवळपास 27.5 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.

राज्यांदरम्यान कार्गो सेवेदरम्यान अडथळा येऊ नये यासाठी गृह मंत्रालयाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

गृह मंत्रालयाचा कंट्रोल रुम नंबर 1930 आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हेल्पलाईन क्रमांक 1033 याचा वापर करून चालक आणि ट्रान्सपोर्टर लॉकडाऊन संबंधित आपल्या तक्रारींवर नोंदवू शकतात.