CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:00 PM 2020-05-14T12:00:26+5:30 2020-05-14T12:13:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र याचा पर्यावरणावर फारच चांगला परिणाम होतो आहे. नद्यांचं पाणी स्वच्छ होतं आहे, ओझोनचा थरही पूर्ववत होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 78,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 2400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.
पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनमध्येही काही दिलासादायक गोष्टी ही समोर येत आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र याचा पर्यावरणावर फारच चांगला परिणाम होतो आहे. नद्यांचं पाणी स्वच्छ होतं आहे, ओझोनचा थरही पूर्ववत होत आहे.
लॉकडाऊनचा आणखी एक फायदा भारताला झाला आहे. गेल्या 40 वर्षांत जे झालं नाही ते आता घडलेलं पाहायला मिळतं आहे.
भारतात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनचं ( Carbon Emissions) प्रमाण कमी झालं आहे. गेल्या चार दशकांत पहिल्यांदाच उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
कार्बन ब्रीफच्या रिपोर्टनुसार, भारतात अनेक वर्षांनी पहिल्यांदाच लक्षणीय प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र हे फक्त लॉकडाऊनमुळे नाही असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
Centre for Research on Energy and Clean Air (CREA) ने हा अभ्यास केला आहे. 2019-20 या मार्च महिन्याच्या अखेरीस कार्बन उत्सर्जन 15 टक्क्यांनी कमी झालं आहे.
भारतात लॉकडाऊनपूर्वी विजेचा वापर कमी झाला होता. नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर वाढला आणि त्यामुळे पारंपारिक ऊर्जेची मागणी कमी झाली.
यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि 40 वर्षांत पहिल्यांदाच भारतात कार्बन उत्सर्जनवाढीचा ट्रेंड बदलल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
कोळशापासून वीजनिर्मितीचं उत्पादन हे मार्चमध्ये 15 टक्के घटलं आणि कार्बन उत्सर्जन 15 टक्के कमी झालं आहे.
एप्रिलच्या पहिल्या 3 आठवड्यात कोळशापासून वीजनिर्मिती 31 टक्के कमी झाली आहे, त्यामुळे एप्रिलपर्यंत कार्बन उत्सर्जन 30 टक्क्यांपर्यंत कमी होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
गाड्यांचा धूर, कोळशापासून वीजनिर्मिती यामधून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होतं असतं.
हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.