CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:26 PM 2020-06-16T14:26:25+5:30 2020-06-16T14:57:06+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: सॅनिटायझरचा वापर सध्या मोठया प्रमाणात केला जात आहे. प्रत्येकाच्या जवळ सॅनिटायझर असतंच. मात्र आता सॅनिटायझरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन लाखांच्या वर गेली असून नऊ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे.
सॅनिटायझरचा वापर सध्या मोठया प्रमाणात केला जात आहे. प्रत्येकाच्या जवळ सॅनिटायझर असतंच. मात्र आता सॅनिटायझरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लोक कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्याच किंमत वाढली आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सॅनिटायझरबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. बऱ्याच ठिकाणी विषारी सॅनिटायझर विकते जात असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
अत्यंत विषारी मिथेनॉलचा वापरुन हँड सॅनिटायझर तयार केले जात आहे. त्याचबरोबर पीपीई किट आणि कोरोना व्हायरसशी संबंधित महत्त्वाचं सामान देखील तयार केलं जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CBI ने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच अशा बनावट, घातक हँड सॅनिटायझरपासून सावध राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे.
देशावर कोरोनाचं मोठं संकट आलेलं असताना पैसे कमवण्यासाठी काही लोक अशा मार्गाचा अवलंब करत आहेत. मात्र हे घातक सॅनिटाझर वापरणं धोक्याचं आहे.
एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक पीपीई किट आणि कोरोना विषाणूशी संबंधित उपकरणांचे निर्मिती करण्यासाठी रुग्णालय व आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
आवश्यक असलेल्या या वस्तूंच्या कमतरतेचा फायदा घेऊन रुग्णालयांकडून ऑनलाईन पेमेंट मिळते, परंतु पैसे घेतल्यानंतरही ते मालाचा पुरवठा करत नाहीत.
मिथेनॉलपासून हे बनावट सॅनिटायझर तयार केले जात असून, मिथेनॉल हा एक अतिशय विषारी पदार्थ आहे. त्यामुळे हात स्वच्छ करण्यासाठी अशा सॅनिटायझरचा वापर करू नका.
काही ठिकाणी मिथेनॉल असलेले सॅनिटाझर विकले जात आहेत. त्यामुळे लोकांनी वेळीच सावध होण गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.