CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अॅप By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:12 PM 2020-05-04T15:12:05+5:30 2020-05-04T15:22:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता घरबसल्या त्यांना शेतमालाची विक्री करता येणार आहे. सरकारने यासाठी एक अॅप लाँच केलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 40 हजारांच्या वर गेला आहे. तर 1100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.
शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता घरबसल्या त्यांना शेतमालाची विक्री करता येणार आहे. सरकारने यासाठी एक अॅप लाँच केलं आहे.
किसान सभा अॅप असं या अॅपचं नाव असून या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची विक्री करता येणार आहे.
किसान सभा अॅपमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) हे अॅप विकसित केले आहे.
शेतकरी, बाजार समितीतील विक्रेते, वाहतूकदार, भाजी बाजारातील मंडळ सदस्य, सेवापुरवठादार आणि ग्राहक हे किसान सभा अॅपचे सहा घटक असणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये शेतमाल बाजारात पाठविणे, बियाणे व खते, शेतमालाला योग्य भाव यासाठी हे अॅप महत्त्वपूर्ण आहे.
किसान सभा अॅपचे उद्घाटन आयसीएआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या हस्ते करण्यात आले.
आयसीएआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र काम करून कृषी विज्ञान केंद्रांचे नेटवर्क या कामासाठी वापरावे, अशी सूचना त्यांनी केली.
शेतकरी, वाहतूकदार, सेवापुरवठादार (खते, बी-बियाणे यांचे विक्रेते, शीतगृहे, गोदाम मालक, मंडईतील विक्रेते) तसेच ग्राहक (किरकोळ विक्रेते, ग्राहक) यांना हे अॅप प्रत्यक्ष जोडते.
खते, बी-बियाणे विक्रेत्यांनाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येते.सर्व सेवा एकाच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी होतो.
शीतगृहे, गोदाम मालक आणि ग्राहकांसाठी देखील हे उपयुक्त आहे. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येते.
शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात आणि वेळेत मध्यस्थांखेरीज संस्थात्मक ग्राहकांपर्यंत मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आधारभूत ठरून नफा वाढेल.
चांगली मागणी असणाऱ्या बाजारपेठा जोडणे, माल पोहोचवण्यासाठी स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध होणे, शेतकऱ्यांचा नफा वाढण्यास हे अॅप उपयुक्त असणार आहे.