CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:06 AM 2020-06-17T10:06:58+5:30 2020-06-17T10:21:48+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 82 लाखांवर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
देशातील रुग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढतेच आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे 11903 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,54,065 वर पोहोचली आहे.
देशात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्राने आता कोरोना चाचणीची क्षमता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता दर दिवशी 3 लाख लोकांच्या चाचण्या करता येणार आहेत.
रेड झोन आणि हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांची चाचणी कऱणं आता अधिक सोपं होणार आहे. लक्षण असणाऱ्यांसोबतच लक्षण नसलेल्या लोकांचीही चाचणी करण्याचा प्रस्ताव आहे.
देशात 907 कोरोनासाठी लॅबोरेट्री तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 659 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 248 खासगी क्षेत्रातील आहेत. आतापर्यंत 59 लाख 21 हजार 69 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारासाठीची सर्व उपकरणे अधिक संख्येने उपलब्ध असणं गरजेचं आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.