व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 05:23 PM2020-08-09T17:23:23+5:302020-08-09T17:39:56+5:30

कोरोना व्हायरसवर मात करण्यसाठी जगभरातील औषध कंपन्या लस तयार करायच्या कामात लागल्या आहेत. अनेक देशांत नाकातून टाकता येईल, अशी लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाणून घेऊया, कोठे तयार होतेय अशी लस? आणि कशा प्रकारे करते काम?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका वृत्तानुसार, हातातून लस देण्याऐवजी वैज्ञानिक नाकातून लस देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही लस नाकाच्या माध्यमाने स्प्रेदेखील केली जाऊ शकते अथावा एअरोसोल डिलीव्हरीच्या माध्यमानेही दिली जाऊ शकते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंपेरिअल कॉलेज आणि येल युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिकदेखील म्यूकसच्या माध्यमाने नाकातून कोरोनाचा खात्मा करण्यासाठी नेसल व्हॅक्सीन अर्थात नाकातून दिली जाणारी लस तयार करत आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाचे इम्यूनोलॉजिस्ट दीप्ता भट्टाचार्य यांनी सांगितले, नाकातून टाकली जाणारी लस ही सुईने दिल्या जाणाऱ्या लसीपेक्षा अधिक प्रभावी असू शकते. कारण जेथून कोरोना व्हायरस शरिरात प्रवेश करतो, थेट त्याच ठिकाणाहून ही लस काम करायला सुरुवात करते.

सध्या संपूर्ण जगभरात अमेरिका, कॅनाडा, नेदरलँड, फिनलँड आणि भारतात नाकातून दिली जाणारी कोरोना लस तयार करण्यात येत आहे. या पाचही देशांतील पाच औषध कंपन्या नाकातून टाकता येईल, अशी लस तयार करत आहेत.

कॅनाडातील युनिव्हर्सिटी ऑफ वाटरलूच्या वैज्ञानिकांनी डीएनए बेस्ड लस तयार केली आहे. नेदरलँडमध्ये व्हॅन्जेनिंजेन, बायोव्हेटरीनरी रिसर्च आणि युट्रेच युनिव्हर्सिटीने सयुक्तपणे इंट्राव्हॅक नेसल व्हॅक्सीन तयार केली आहे.

या शिवाय अमेरिकेतील अल्टीइम्यून नावाची औषध कंपनी अॅडकोविड नेसल व्हॅक्सीन तयार करत आहे. भारतात भारत बायोटेकने कोरोफ्लू व्हॅक्सीन तयार केली आहे. फिनलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ईस्टर्न फिनलँड आणि युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीनेदेखील नेसल व्हॅक्सीन तयार केली आहे.

नेसल व्हॅक्सीन म्हणजे नाकातून दिली जाणारी कोरोना लस. ही लस रुग्णाच्या नाकातून दिली जाते.

भारतात तायर झालेली कोरोफ्लू ही जगप्रसिद्ध फ्लूचे औषध एम2एसआरच्या बेसवर तयार केली जात आहे. हे औषध योशिहिरो कावाओका आणि गॅब्रिएल न्यूमॅन यांनी संयुक्तपणे तयार केले होते. एम2एसआर इनफ्लूएंझा आजारावरील एक शक्तीशाली औषध आहे.

हे औषध शरीरात जाताच, फ्ल्यूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करते. आता योशिहिरो कावाओका ने एम2एसआर औषधात कोरोना व्हायरसचे जीन सीक्वेंस एकत्र केले आहे.