CoronaVirus News: भारतात 100 दिवसांत होणार कोरोनाचा खात्मा, पण...; तज्ज्ञांनी व्यक्त केली 'ही' गंभीर भीती! By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 02:04 PM2020-06-07T14:04:11+5:302020-06-07T14:18:33+5:30Join usJoin usNext देशात कोरोनाचा वेगाना प्रसार होत असतानाच सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. दावा करण्यात येत आहे, की सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातून कोरोनाचा खात्मा होऊ शकतो. हा दावा आरोग्य महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. अनिल कुमार आणि सहायक उप-महासंचालक (लेप्रोसी) डॉ. रुपाली रॉय यांनी मॅथ्सच्या बेली मॉडेलच्या आधारावर अध्ययन केल्यानंतर केला आहे. हा स्टडी रिपोर्ट एपिडेमीओलॉजी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. (प्रतीकात्मक फोटो) या रिपोर्टनुसार, रविवार 7 जून ते मंगळवार 15 सप्टेंबर 2020पर्यंत 100 दिवसांत कोरोना व्हायरसचा खात्मा होईल. मात्र, यापूर्वी एम्समधील तज्ज्ञांनी म्हटले होते, की जून आणि जुलै महिन्यात कोरोना संक्रमण सर्वाधिक असेल. ते परमोच्च बिंदू गाठेल. 'संक्रमित आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सारखीच' - या अध्ययनात मॅथेमॅटिकल बेस्ड बेली मॉडेलला आधार मानण्यात आले आहे. यानुसार, जेव्हा संक्रमित लोकांच्या संख्ये एवढे लोक त्या आजारातून बरे होतात अथवा त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा कोणतीही महामारी नष्ट होते. याचाच अर्थ बऱ्या होणाऱ्या रुग्णांची अथवा मरणाऱ्या रुग्णांची संख्या किंवा दोन्हींना एकत्रित करून एकूण संख्या संक्रमित रुग्णांच्या बोरोबरीत असायला हवी. महामारीचे आकलन करण्यासाठी बेली मॉडेल रिलेटिव्ह रिमूव्हल रेट अर्थात बीएमआरआरआर काढले जाते. हे आजारातून बऱ्या होणाऱ्या अथवा मृत्यू पावलेल्या लोकांच्या संख्येवर निश्चित होते. 50 टक्क्यांवर पोहोचला आहे बीएमआरआरआर - या संशोधनात 19 मेपर्यंतचे आकडे दर्शवण्यात आले आहेत. तेव्हा देशात 1,06,475 लोकांना कोरोनाची लागण झालेली होती. यापैकी 42,306 लोक ठणठणीत होऊ घरी परतले होते. तर मरणारांची संख्या 3,302 एवढी होती. या आधारे बीएमआरआरआर रेट 42% होता. डॉ. अनिल सांगतात, ''जेव्हा बीएमआरआरआर 100 टक्के होतो, तेव्हाच महामारी नष्ट होत असते." आतापर्यंत देशाचा बीएमआरआरआर 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आमचे गणित सांगते, की सप्टेंबरच्या मध्यापर्यंत तो 100 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. तेव्हा या महामारीचा खात्मा होईल. 'निकालाची 100 टक्के हमी नसते' - डॉ. अनिल म्हणाले, युरोपातील अनेक देशांत बेली मॉडेलने आकलन करण्यात आले. ते तंतोतंत बोरोबर आले आहे. मात्र, आकलन यशस्वी होण्यात काही इतर कारणांचाही समावेश असोत. त्यामुळे निलाकाची 100 टक्के हमी देता येत नाही. जून-जुलैमध्ये आढळतील सर्वाधिक रुग्ण - बेली मॉडेलने दावा करण्यापूर्वी एम्स नवी दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दावा केला होता, की जून-जुलैमध्ये कोरोना संक्रमण भारतात परमोच्च बिंदू गाठेल. अर्थात या दिवसांत भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडतील. यानंतर संक्रमणाचा प्रभाव कमी होऊ लागेल. डॉ. रणदीप यांचा हा अंदाज खरादेखील वाटू लागला आहे. जून महिना सुरू होताच संक्रमित रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. देशतील कोरोनाची स्थिती - देशात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा आता 2 लाख 46 हजार 628वर पोहोचला आहे. आतापर्यंत 1 लाख 19 हजार 293 लोक बरे होऊन घरीही गेले आहेत. तर 6929 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 9971 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 287 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. येथे संक्रमित रुग्णांची संख्या 82 हजारवर 968 वर पोहोचली आहे. तर 2 हजार 969 लोकांचा मृत्यू झाला आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्याभारतमहाराष्ट्रहॉस्पिटलडॉक्टरआरोग्यcorona virusCoronavirus in MaharashtraCoronaVirus Positive NewsIndiaMaharashtrahospitaldoctorHealth