CoronaVirus News : कोरोनावर कधी नियंत्रण मिळवता येणार?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:33 AM 2020-08-31T08:33:22+5:30 2020-08-31T08:53:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल आणि कोरोना लस कधी उपलब्ध होईल, कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल याबाबत हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी ही सातत्याने समोर येत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मात्र याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर येत आहे.
जगभरात कोरोनावरील औषध आणि लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी चाचण्या यशस्वी झाल्या असून संशोधनाला यश येत आहे.
देशात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना बरे होण्याऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण दिसत आहे. कोरोना व्हायरस संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल आणि कोरोना लस कधी उपलब्ध होईल, कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल याबाबत हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे.
दिवाळीपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाला मोठं यश मिळेल अशी आशा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग हा पुढच्या काही महिन्यांत नियंत्रणात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच 2020च्या अखेरीस कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी आशा असल्याचं देखील म्हटलं आहे.
कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणला. आरोग्याबाबत अधिक सतर्क आणि सावध राहायला हवं. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती हर्षवर्धन दिली.
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर 60 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये 4,96,070 नवे रुग्ण आढळले आहेत.
जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशामध्ये हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.