CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:59 PM2020-06-04T16:59:47+5:302020-06-04T18:09:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन आता शिथिल करण्यात आला आहे. 8 जूनपासून रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जेव्हा तुम्ही आता जेवायला बाहेर जाल तेव्हा अनेक गोष्टी बदललेल्या दिसतील.

कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. मात्र याच दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व काळजी घेतली जात आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत.

लॉकडाऊन आता शिथिल करण्यात आला आहे. 8 जूनपासून रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जेव्हा तुम्ही आता जेवायला बाहेर जाल तेव्हा अनेक गोष्टी बदललेल्या दिसतील.

हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी वेगळ्या दिसतील. रेस्टॉरंटमध्ये बसण्यापासून ते जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व नियम वेगळे असणार आहेत.

बसण्याच्या व्यवस्थेपासून ते किचनपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणार असून अनेक रेस्टॉरंटने त्यासाठी तयारी देखील सुरू केली आहे.

ROSEATE HOTELS N RESORTS चे सीईओ कुश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलवर हॉटेलच्या स्वयंपाकघरातील परिस्थिती ही ग्राहक पाहू शकतात.

भारतात प्रथमच आम्ही हा प्रयोग करत आहोत. जेवण कसे तयार केले जात आहे आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली जात आहे हे ग्राहक स्वत: पाहू शकतात अशी माहिती कपूर यांनी दिली.

ऑनलाईन ऑर्डर ही आधीपासूनच अनेक ठिकाणी घेतली जाते. मात्र आता प्रामुख्याने ऑनलाईन ऑर्डरवर हा अधिक भर असणार आहे. जेणेकरून लोकांना ऑर्डरसाठी रेस्टॉरंटमध्ये येण्याची गरज नाही.

रेस्टॉरंट्समध्येही डिजिटल बुकींग सुरू करण्यात येणार आहे. ऑर्डरपासून पेमेंटपर्यंत सर्व काही डिजीटल असणार आहे.

रेस्टॉरंट्समधील स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सर्व प्रमुख रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छतेसाठी खास प्रोटोकॉल तयार करण्यात आले आहेत.

शेफला मुख्य स्वच्छता अधिकारी देखील बनविण्यात आले आहे. प्रत्येक कुक आणि कर्मचार्‍यास वेळोवेळी हात धुणे आणि मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

रेस्टॉरंट्समध्ये एक टेबल राखून आसन व्यवस्था असेल. एकावेळी एकाच टेबलवर दोनपेक्षा जास्त लोक बसू शकणार नाहीत.

मॅकडोनाल्डची फास्टफूड चेन पुन्हा एकदा ग्राहकांसाठी दरवाजे उघडण्यासाठी तयार आहे. मॅकडोनाल्डमध्ये आता फक्त कर्मचारीच नव्हे तर ग्राहकांचेही थर्मल चेकअप केले जाणार आहे.

सेल्फ-सर्व्हिस येथे असल्याने सेल्फ-ऑर्डरिंग कियॉस्कमध्ये फ्रंट काउंटर, वॉशरूम स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. खुर्चीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग मार्क केले जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.