CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:31 PM 2020-06-15T15:31:36+5:30 2020-06-15T15:45:15+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 332424 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात 9520 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 11,502 नवे रुग्ण आढळून आले असून 325 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार आहे.
कोरोनाची लक्षणं आढळल्यास चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रिपोर्ट यायला बराच वेळ लागतो. आता काळजी करण्याची गरज नाही कारण 30 मिनिटांत त्याबाबत माहिती मिळणार आहे.
इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च (ICMR) ने अँटिजेन टेस्टिंग किट्सला मंजुरी दिली आहे. ज्याच्यामदतीने केवळ अर्ध्या तासाच रिझल्ट मिळणार आहे.
कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट केली जात होती. ज्या चाचणीचा रिपोर्ट यायला खूप वेळ लागत होता. मात्र आता कोरोनाची चाचणी करण्यासाठी अँटिजेन टेस्ट किट वापरलं जाणार आहे.
अँटिजेन टेस्टमध्ये जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार असल्याने रुग्णांवर लवकरात लवकर योग्य ते उपचार करणं देखील सोपं होणार आहे. याचा फायदा होणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना ICMR ने याबाबत माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
कुटुंबाकडे रुग्णाचा मृतदेह देण्याआधी रिपोर्टची गरज लागणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी मंत्रालयाने दिल्ली सरकारला पत्र लिहिले आहे.
कोविड-19 मुळे संशयित रुग्णांच्या लॅब रिपोर्टची वाट न पाहता मृतदेह हा कुटूंबाकडे सोपवावा, मात्र अंत्यसंस्कार हे सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येतील असं सांगितलं आहे.