CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 03:16 PM 2020-09-09T15:16:14+5:30 2020-09-09T15:50:43+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचं रिसर्चमध्ये स्पष्ट केलं आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 43,70,129 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 73,890 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 89,706 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,115 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत.
भारतात काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले आहेत. प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होत असल्याची माहिती समोर आली होती.
कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नसल्याचं म्हटलं आहे. रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे.
14 राज्यांच्या 39 रुग्णालयातील 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्यानंतर आयसीएमआरच्या संशोधकांनी असं म्हटलं आहे. रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचं रिसर्चमध्ये स्पष्ट केलं आहे.
संशोधनानुसार प्लाझ्मा थेरपीचा थोडा वापर नक्कीच दिसून आला. श्वासोच्छवास घेताना समस्या किंवा थकवा कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर झाला.
ताप किंवा खोकला यासारख्या लक्षणांवर मात्र प्लाझ्मा थेरपीचा वापर होऊ शकला नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात असल्याने प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांनी प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं.
रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.
जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात.
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.