CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे! By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:52 PM 2020-06-28T13:52:22+5:30 2020-06-28T14:27:20+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आली असून रुग्णावर उपचार सुरू आहेत. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 19,906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 410 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,28,859 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 16,095 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आली असून रुग्णावर उपचार सुरू आहेत.
दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत असताना दिल्लीकरांसाठी एक दिलासादायक माहिती आहे. रुग्णांवर वेळेवर आणि तातडीने उपचार करता यावे यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
राजधानी दिल्लीत जगातील सर्वात मोठं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. सरदार पटेल कोविड केअर सेंटर असं यांचं नाव असून यामध्ये तब्बल 10 हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणं आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी दिल्लीमध्ये हे खास सेंटर उभारण्यात आलं आहे. तसेच काही बेड्सना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे.
कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यानुसार सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी देखील असणार आहेत.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह 875 पेक्षा जास्त डॉक्टरांना ड्युटीवर असणार आहेत. आयटीबीपीकडे याची जबाबदारी असणार आहे.
कोरोनाग्रस्त सेंटरमध्ये दाखल होण्यापासून ते उपचारानंतर बरे झाल्यावर देण्यात आलेल्या डिस्चार्जपर्यंत सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
अमित शाह यांनी डॉक्टरांशी चर्चा करून सर्व रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच सेंटरमध्ये असलेल्या सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सर्वात मोठ्या कोविड सेंटरसाठी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.