CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 01:31 PM2020-05-14T13:31:15+5:302020-05-14T13:48:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याच दरम्यान काही औषधांचे ट्रायल (चाचणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून कोणतं औषध हे कोरोनावर प्रभावी ठरतं याची माहिती मिळणार आहे.

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा अडीच लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे.

कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत.

भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 78 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 2400 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात आहेत.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याच दरम्यान काही औषधांचे ट्रायल (चाचणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून कोणतं औषध हे कोरोनावर प्रभावी ठरतं याची माहिती मिळणार आहे.

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, WHOच्या या ट्रायलमध्ये 1500 भारतीय कोरोनाग्रस्तांचा समावेश असणार आहेत. तसेच यामध्ये जगभरातील 100 देशांच्या रुग्णांचा देखील समावेश आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ट्रायलसाठी रुग्णांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशातील 9 रुग्णालयांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

ट्रायल दरम्यान रुग्णांना अँटी-व्हायरल औषधं दिली जातील. यामध्ये रेमेडीसवीर, क्लोरोक्विन / हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपीनावीर-रीटोनाविर या औषधांचा समावेश असणार आहे.

कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रूग्णांवर अधिक परिणाम होत आहे की नाही याची माहिती ही चाचणीतून मिळणार आहे.

जोधपूरमधील एम्स, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे.

ICMR-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NARI) डॉक्टर शीला गोडबोले यांनी सध्या आम्ही आकडेवारीचे पालन करीत आहोत, त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण जास्त आहेत, तेथे चाचणी साइट्स असतील असं म्हटलं आहे.

9 रुग्णालयांना यासाठी देण्यात आली आहे. लवकरच आणखी 4 रुग्णालयांना ग्रीन सिग्नल देण्यात येईल अशी माहिती गोडबोले यांनी दिली आहे.

रुग्णांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.आम्ही या प्रोग्राममध्ये आणखी रूग्णांचा समावेश करू शकतो असंही शीला गोडबोले यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.