CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 09:33 AM2020-08-10T09:33:11+5:302020-08-10T09:54:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास दोन कोटींच्या वर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून दिवसागणिक गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.

भारतातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकूण रुग्णांची संख्या ही 22,15,075 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

एका दिवसात कोरोनाचे तब्बल 62,064 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,007 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 44,386 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाबतची सुखावणारी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर मात केली आहे.

देशात आतापर्यंत तब्बल 15 लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी दिली आहे.

10 राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक असून देशातील 80 टक्के रुग्ण या राज्यांमधील असल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न हे केले जात आहेत. मात्र कोरोनाचा ग्राफ वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णसंख्येने मोठा दिलासा दिला आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. 24 तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात आतापर्यंत 2,416,535 इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 68.78 टक्के झाले आहे.

देशातील मृत्यूप्रमाण कमी झाले असून ते 2.01 टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,024,263 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 12,898,238 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

जगात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read in English