CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 10:59 AM2020-08-03T10:59:11+5:302020-08-03T11:11:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा उद्रेक होत असतानाच अनेक धक्कादायक घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगभरातील एकूण रुग्णांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे.

देशातही कोरोनाचा धोका हा झपाट्याने वाढला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णांचा आकडा हा तब्बल 18,03,696 वर गेला आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 52,972 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 771 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 38,135 लोकांचा बळी गेला आहे.

संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा उद्रेक होत असतानाच अनेक धक्कादायक घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

कोरोना टेस्ट केल्यानंतर शहरातून तब्बल 2290 कोरोना पॉझिटिव्ह गायब झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लखनऊमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरलं आहे.

कोरोना टेस्ट केल्यानंतर या रुग्णांनी सरकारला नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांकाबाबत खोटी माहिती दिली आहे. यामुळेच त्यांना शोधणं आता आणखी कठीण झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायब झालेल्या रुग्णांना शोधण्याची जबाबदारी ही कोविड-19 सर्विलान्स टीमकडे सोपवण्यात आली आहे. 2290 कोरोना रुग्ण गायब झाल्याची शक्यता आहे.

गायब असलेल्या रुग्णांपैकी 1171 जणांना शोधण्यात आलं आहे. तर 1119 रुग्ण अजूनही बेपत्ता आहेत. शोधण्यात आलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

23 ते 31 जुलै दरम्यान या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.टेस्ट केल्यानंतर हे रुग्ण गायब झाले. जेव्हा प्रशासनाने त्यांचे नाव आणि पत्ता यांची तपासणी केली तेव्हा ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाच्या या संकटात चुकीची माहिती दिल्याबद्दल या रुग्णांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच गायब असलेल्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने रुग्णांची तपासणी केली जाते. यात काही रुग्ण फॉर्मवर आपली खोटी माहिती देत असल्याचं समोर आलं आहे.

जिल्हा प्रशासनाने दुसरीकडे रविवारी कोविड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी 189 लोकांकडून तब्बल 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

7179 लोकांकडून आतापर्यंत 27,13,667 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.