CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर' By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:53 PM 2020-07-17T14:53:45+5:30 2020-07-17T15:25:46+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढत आहे. अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी 30 हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. तर आतापर्यंत तब्बल 25,602 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढत आहे. अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या दिल्लीतून आता आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोनवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात दिल्लीमध्ये यश येत असून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. खबरदारीचे योग्य उपाय केले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येत आहे.
भारतामध्ये दिल्लीची आरटी व्हॅल्यू सध्या अंदमान अँड निकोबार (0.88) नंतर सर्वात कमी आहे. म्हणजेच दिल्लीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.
दिल्लीचा रिकव्हरी रेट 82% हून जास्त दिल्लीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1.18 लाखांहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत 97,693 लोक बरे झाले असून त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
दिल्लीतील रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 82 टक्क्यांहून जास्त असल्याची माहिती मिळत आहे.
चाचण्यांची संख्या चार पटीने वाढली जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. तेव्हा दिवसाला जवळपास पाच ते सहा हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र आता हे वाढवण्यात आलं आहे.
कोरोना चाचण्यांची संख्या ही चार पटीने वाढवण्यात आली आहे. रॅपिड अँटिजन किटचा देखील वापर केला जात आहे. सध्या दिल्लीत दररोज 21 ते 23 हजार चाचण्या केल्या जातात.
15 हजारांहून अधिक बेड्स उपलब्ध दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका वाढत असताना फक्त 700 बेड हे कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध होते. मात्र आता त्याची संख्या वाढवण्यात आली असून 15 हजारांहून अधिक बेड्स उपलब्ध आहेत,
दिल्लीतील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पल्स ऑक्सिमीटर्समुळे मृत्यू रोखण्यात यश - केजरीवाल दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर्सची मोठी मदत होत असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
पल्स ऑक्सिमीटर्समुळे मृत्यू रोखण्यात यश आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
प्लाझ्मा बँक केली तयार कोरोनाग्रस्तांसाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर अससल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. याचा रुग्णांना मोठा फायदा झाला आहे.
दिल्लीमध्ये प्लाझ्मा बँक तयार करण्यात आली आहे. तसेच रुग्णवहिकाही फोन केल्यावर लवकर पोहचतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 592,690 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जगभरात रुग्णांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. तब्बल 13,949,386 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,278,974 लोक बरे झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. सोशल डिस्टिंसिंग, मास्क, क्वारंटाईन केले जात आहे. तसेच कोरोना चाचणीवर देखील अधिक भर दिला जात आहे.