CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:55 PM2020-06-01T16:55:09+5:302020-06-01T17:11:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1 ची घोषणा केली.

भारतातील कोरोना व्हायरसचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 झाली आहे.

देशात आतापर्यंत 5 हजार 394 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 91 हजार 818 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी देशभरात पुन्हा एकदा आठ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1 ची घोषणा केली.

एकीकडे लॉकडाऊन हटवल्याता लोकांमध्ये आनंद आहे. तर दुसरीकडे यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं तर होणार नाही ना? याची भीती निर्माण झाली आहे.

भारताच्या ICART (India Covid19 Apex Research Team) या टीमने लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा याबाबत अभ्यास केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी लॉकडाऊन हटवण्याची योग्य वेळ सांगितली आहे.

AIIMSचे डॉक्टर गिरीधर गोपाल परमेश्वरन, मोहकृत गुप्ता, सप्तर्षी सोहम मोहंता आणि त्यांच्या टीमचा यामध्ये समावेश आहे. सरकारने आता आपली आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

देशात अचानक लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याची चिंता आहे. जगात ज्या गतीने कोरोनाग्रस्तांच्या संख्या वाढत आहे. मात्र तशी परिस्थिती भारतात नाही आहे.

भारतातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र लॉकडाऊन हटवल्यास लोक घराबाहेर पडतील यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होऊ शकतो.

देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या 7 दिवसांच्या रोलिंग एव्हरेजमध्ये अद्याप घट दिसून आलेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिल करणे योग्य नाही.

चीनमधील परिस्थिती पाहता टीमनं चीनमध्ये हा संसर्ग जवळजवळ संपला होता, मात्र कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. 13 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये 15,133 प्रकरणे नोंदली गेली.

दोन महिन्यांनंतर चीनने लॉकडाऊन हटवला. लॉकडाऊन शिथिल केला तर पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांची आवश्यकता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशात आता सामुहिक संक्रमणाचा धोका वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी दावा केला आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकत कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे.