CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर... By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 08:31 AM 2020-06-13T08:31:10+5:30 2020-06-13T08:57:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी महत्त्वाचे संशोधन केले जात आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. तर आठ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 2 लाख 97 हजारांवर गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.
कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी महत्त्वाचे संशोधन केले जात आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा धोका वाढत असल्याने त्यासंबंधित काही लक्षणं असल्यास वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
वास किंवा चव घेण्याची क्षमता अचानक गमावणे हे कोविड-19 च्या अन्वेषणात निकष म्हणून सहभागी करण्याबाबत सध्या सरकार विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहे. रविवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र त्यावर एकमत झाले नाही.
कोविड-19 च्या चौकशीत अनेक रूग्णांमध्ये वास किंवा चव येण्याच्या शक्ती कमी होत असल्याचं आढळून आलंय तर काही तज्ज्ञांच्या मते, जरी ही लक्षणे कोविड-19 दिसत असली तरी त्याचा थेट संबंध नाही.
फ्लू किंवा इन्फ्लूएन्झामुळे व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमताही बिघडते, हे या आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते आणि लवकरच यावर उपचार करता येऊ शकते.
सीडीसीपीने मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची नवीन लक्षणे समाविष्ट केली होती. ज्यात वास कमी होणे किंवा चव गमावणे यांचा समावेश आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) 18 मे रोजी कोविड - 19 साठी जाहीर केलेल्या सुधारित तपासणी रणनीतीनुसार हाय रिस्कमधील लोकांच्या संपर्कात आल्यानंतर पुढील 5 ते 10 दिवसांत एकदा तरी तपासणी करणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमधून देश बाहेर पडत असताना आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही.
जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 75 लाखांवर पोहोचली असून मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे.