CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:30 PM 2020-07-13T12:30:10+5:30 2020-07-13T13:00:57+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे. देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 28,701 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 8 लाखांचा टप्पा पार केला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 500 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे देशातील परिस्थीत गंभीर झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 8,78,254 वर गेला आहे.
देशात सध्या 3,01,609 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
देशात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त चार दिवसांत तब्बल एक लाख नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा पार केला.
देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे.
देशातील पाच लाख लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. तब्बल 5,53,471 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63 टक्के झाले आहे. दिलासादायक म्हणजे जगभरात भारताचा रिकव्हरी रेट हा सर्वाधिक आहे.
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याने अधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे.
देशात होम आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, मास्कच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे. प्रशासनाने लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.
चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत चालला आहे.
अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतपर्यंत जगभरात तब्बल 7,588,510 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 571,698 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 13,042,340 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देश सज्ज झाले आहेत. कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर काम सुरू आहे.