CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार? By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 03:36 PM 2020-06-18T15:36:46+5:30 2020-06-18T15:56:34+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या लढ्यात रुग्णांवर उपचार करताना एक नवीन थेरपी वापरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी थेरपी वापरण्याच्या तयारीत आहेत. जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 84 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना पुढे अनेक देश हतबल झाले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात 12000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.
औषध अथवा लस नाही तर आता कोरोनाच्या लढ्यात रुग्णांवर उपचार करताना एक नवीन थेरपी वापरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी थेरपी वापरण्याच्या तयारीत आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना आता रेडिएशन थेरपी वापरण्यात येत आहे. रुग्णांमधील न्यूमोनियाचा परिणाम कमी करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) संशोधन सुरू केलं आहे.
AIIMSच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक डॉ. डीएन शर्मा यांनी ऑक्सिजनवर असलेल्या दोन कोरोना रुग्णांना रेडिएशन थेरपी देण्यात आल्याची माहिती दिली.
डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कोरोना रूग्णांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. या कोरोना रूग्णांना यापूर्वी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
रेडिएशन थेरपीनंतर या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता त्यांचा ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कॅन्सरवरील उपचारात रेडिएशन थेरपीचा हाय डोस दिला जातो.
कोरोन रुग्णांना कमी डोसची रेडिएशन थेरपी देण्यात आली. या थेरपीचा कोणताही वाईट परिणाम त्यांच्यावर झाला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
जेव्हा अँटीबायोटिक्स उपलब्ध नव्हते, तेव्हा रेडिएशन थेरपी 1940 च्या दशकात न्यूमोनियाच्या उपचारात वापरली जात असल्याचं देखील शर्मा यांनी सांगितलं आहे.
पायलट प्रोजेक्टअंतर्गत आणि कोरोनाच्या 8 रुग्णांवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर येणाऱ्या रिझल्टचं विश्लेषण केलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.