CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:42 PM 2020-05-26T12:42:33+5:30 2020-05-26T13:06:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे अनेकांनी नातेवाईकांचे मृतदेह स्विकारण्यास नकार दिला आहे. कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या सव्वा लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार 535 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 146 जणांचा मृत्यू झाला आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे अनेकांनी नातेवाईकांचे मृतदेह स्विकारण्यास नकार दिला आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे अनेकांनी नातेवाईकांचे मृतदेह स्विकारण्यास नकार दिला आहे.
आपले वाटणारे देखील परके झाले आहेत. अशातच एका कोरोना योद्ध्याने पुढाकार घेतला आहे. तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर त्याने अंत्यसंस्कार केले आहेत.
विष्णू असं या व्यक्तीचं नाव असून ते जयपूरमध्ये राहतात. निराधार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत असून ते व त्यांच्या टीमने मिळून आतापर्यंत 68 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
विष्णू आणि त्याच टीम कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. हे काम करण्यासाठी ते धर्म-जातीचा भेदभावही करत नाही.
अंत्यसंस्कार केलेल्यांमध्ये 15 मुस्लीम मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे आणि 53 मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे.
अनेकदा नातेवाईक रुग्णालयांमध्ये मृतदेह तसाच ठेवून निघून जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. हा मृतदेह तासनतास रुग्णालयात पडून राहतो.
कोरोना योद्ध्यांनी त्यामुळेच त्यांची शेवटची क्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.