coronavirus ministry of ayush is going for trial for corona medicine vrd
CoronaVirus : आयुष मंत्रालयाकडून चार आयुर्वेदिक औषधांची चाचणी, कोरोनाविरोधात ठरू शकतात निर्णायक By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 03:52 PM2020-05-07T15:52:29+5:302020-05-07T16:02:42+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसविरोधातली लढाई जिंकण्यासाठी आयुष मंत्रालय आयुर्वेदाच्या चार औषधांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर चाचण्या घेणार आहे. दोन दिवसात सुरू होणारी ही चाचणी 12 आठवडे चालणार आहे आणि 1000 रुग्णांवर प्रयोग केला जाणार आहे. आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर मिळून ही चाचणी घेत आहेत. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय व सीएसआयआर यांनी मिळून तीन प्रकारे यावर अभ्यास केला आहे. या चार औषधांवरील चाचण्या देशभर सुरू करत आहोत. आम्ही अत्यंत मोठ्या नमुन्यांवर अभ्यास करीत आहोत, असं राजेश कोटेचा यांनी सांगितलं आहे. ज्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे किंवा जास्त जोखीम असलेल्या रुग्णांच्या नमुन्यांवर हा अभ्यास सुरू आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आयुष मंत्रालय या औषधांच्या माध्यमातून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासंदर्भात ५० लाख लोकांवर प्रयोग करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे ही चारही औषधे आयुर्वेदातील असल्यानं त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. मुंबई, पुणे येथे होमिओपॅथी चाचणी सुरू झाली आहे. योगाची चाचणीदेखील सुरू झाली. प्राथमिक टप्प्यात या चाचणीसाठी 1000 रुग्णांचे नमुने घेतले गेले असून, त्याआधारेच प्रयोग घेतले जात आहेत. जे कोरोना रुग्ण आहेत त्यांच्या 1000 नमुन्यांवर 12 आठवडे अभ्यास केला गेला आहे. पुढील दोन दिवसांत चाचणी घेण्यास सुरुवात होईल. ही अशी औषधे आहेत जी रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात, ज्याद्वारे चाचण्या केल्या जातील. अश्वगंधा, गुडूची (गुलबेल) पीपली, मुलठी, आयुष 64 या चार औषधांवर आमचं संशोधन सुरू आहे. या औषधांद्वारे चाचण्या केल्या जातील.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusCoronavirus in Maharashtra