coronavirus: ये मेरा इंडिया... घरात बंद असूनही पक्षांसाठी चारा-पाण्याची सोय By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 08:08 PM 2020-03-26T20:08:46+5:30 2020-03-26T20:15:41+5:30
india lockdown for 21 days ordered by our prime minister narendra modi, indian in their home but birs flying with freedom. Man taking care of birds with water and food लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरात बसले आहेत. मात्र, पक्षीप्रेमी अन् प्राणी मित्रांकडून आपली जबाबदारी किंवा कर्तव्य निष्ठेनं पार पाडलं जात आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात घरात बसून पुण्य कमवायची हीच ती वेळ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार १४ एप्रिलपर्यंत देशात लॉक डाऊन करण्यात आलंय. त्यामुळे कुणीही इच्छा असो वा नसो.. घराबाहेर पडूच शकत नाही.
तसेच कोरोनाबद्दलचं गांभीर्य आता नागरिकांमध्ये दिसून येतंय, त्यामुळे लोकंही घराबाहेर पडत नसून स्वत:हूनच घरात बसण्याचं आवाहन सर्वांना करत आहेत.
नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे पक्ष आणि प्राणीमित्रांची पाण्यासाठी, तहान भागविण्यासाठी ओढाताण होते. पक्ष्यांची ही ओढाताण प्राणी मित्रांनी समजून घेत पक्षांसा दाना-पाण्याची सोय केली जातंय.
कोरोनाच्या काळात अनेकदा माणूसकीच दर्शन घडतंय. बऱ्याचदा पोलिस बांधवांकडूच हे पाहायला मिळते. पोलीस बांधवही अशा प्राणी अन् पक्षांसाठी चारा-पाण्याची सोय करतात.
कोरोनामुळे माणूस घरात बसला आहे, पण घराबाहेर असलेल्या पक्षांसाठी घराबाहेर पाणी ठेवताना दिसून येतोय. तसेच, ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनही याकडे जातीनं लक्ष दिलं जात असल्याचं दिसतंय.
तरी आपल्या घराबाहेर किंवा छताबाहेर नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची व त्यांच्यासाठी अन्नाची सोय करायला हवी.
आपण आपल्यासाठी किराणा भरण्यास दुकानात गर्दी केली, आता आपल्या घराबाहेर गर्दी करणाऱ्या पक्ष्यांसाठी घरातील दाळ, तांदुळ किंवा इतरही त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे अन्न ठेवून माणूसकी जपावी.
पंछी नदीय पनव के झोके, कोई सरहद न इन्हे रोके... या गाण्यातील बोलीप्रमाणे आपल्या घराबाहेर येणाऱ्या पक्षांसाठी आपलं प्रेमळ रुप दाखवून द्याव.