CoronaVirus News : मोठा दिलासा! वाढत्या कोरोना केसेस आता नाही देणार टेन्शन; तज्ज्ञांनी दिली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:32 PM2022-05-03T14:32:45+5:302022-05-03T14:46:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,568 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि एक हजाराहून अधिक रुग्ण दररोज समोर येत आहेत. तेव्हापासून राजधानीत कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता वाढली आहे.

रुग्णांची संख्या वाढत असतानाही तज्ञ फारसे चिंतीत नाहीत. त्यांनी प्रकरणांमध्ये अचानक वाढ होणे हे दिल्लीतील कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेचे लक्षण नाही असं म्हटलं आहे. यामुळे कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सफदरजंग हॉस्पिटलच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पण बरे होण्याचा कालावधी फक्त 4-5 दिवस आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त काळजी करण्यासारखे काही नाही.

डॉ जुगल किशोर यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 ची नवीन प्रकरणे दिल्लीत आठवडाभर वाढू शकतात आणि त्यानंतर प्रकरणे कमी होऊ लागतील. कोरोनाचा इनक्यूबेशन पीरियड आणि क्लिनिकल रिकव्हरी कालावधी केवळ 4-5 दिवसांचा झाला आहे.

जेव्हा कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर कोणतेही बंधन नसते, तेव्हा एक संक्रमित व्यक्ती 200 लोकांना संक्रमित करू शकते. तथापि, संसर्ग जितक्या वेगाने होतो तितक्या वेगाने नवीन प्रकरणे देखील कमी होतात.

डॉक्टर जुगल किशोर म्हणाले की, कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे, परंतु फार कमी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. म्हणूनच लोकांना जास्त घाबरण्याची गरज नाही, कारण कोविड-19 चे नवीन रुग्ण घरीच बरे होत आहेत.

दिल्लीत सोमवारी 24 तासांत कोरोनाचे 1076 नवीन रुग्ण आढळले असून एकाचाही मृत्यू झाला नाही, तर या कालावधीत 1329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिल्लीत कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि 5744 रुग्ण उपचार घेत आहेत.

दिल्लीतील संसर्ग दर 6.42 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोविड-19 च्या 16,753 चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 1076 नमुने संक्रमित आढळले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

देशात कोरोनाचा वेग मंदावला होता. पण आता पुन्हा एकदा नव्या रुग्णांच्या संख्येने चिंतेत भर टाकली आहे. अनेक राज्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.