CoronaVirus News US Fighter jets fly over New York to honour health workers battling coronavirus kkg
CoronaVirus News: चारच दिवसांपूर्वी 'या' देशाच्या सैन्यानं कोरोना योद्धांना केला हवाई सलाम By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 03:15 PM2020-05-03T15:15:51+5:302020-05-03T15:25:16+5:30Join usJoin usNext आपला जीव धोक्यात घालून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सैन्यानं आज अनोखी मानवंदना दिली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली. सकाळी श्रीनगरमधून हवाई दलाच्या विमानांनी फ्लायपास्ट सुरू केला. दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा आणि लखनऊमध्ये लढाऊ विमानांनी फ्लाय पास्ट करत कोरोना योद्ध्यांचे अनोख्या पद्धतीनं आभार मानले. श्रीनगर, चंडीगढ, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोईम्बतूर आणि तिरुअनंतपुरममध्ये हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी फ्लाय पास्ट केला. सुखोई-३० विमानांनी मरीन ड्राईव्हवर पुष्पवृष्टी करत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यानंतर के. ई. एम आणि कस्तुरबा रुग्णालयांवरदेखील पुष्पवर्षाव करण्यात आला. देशभरातल्या फ्लायपास्टमध्ये हवाई दलाच्या सुखोई-३०, मिग-२९, जग्वार या लढाऊ विमानांनी सहभागी घेतला. याशिवाय सी-१३० वाहतूक विमानदेखील फ्लायपास्टमध्ये सहभागी झालं होतं. चारच दिवसांपूर्वी अमेरिकेमध्येही सैन्यानं असाच फ्लायपास्ट केला. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी हा फ्लायपास्ट करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २२ एप्रिलला याबद्दलची घोषणा केली होती. अमेरिकन हवाई दलाची थंडरबर्ड्स आणि नौदलाची ब्ल्यू एंजल्स विमानं यामध्ये सहभागी घेतील, असं ट्रम्प म्हणाले होते. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागे देश उभा आहे, हे दाखवण्यासाठी ऑपरेशन अमेरिका स्ट्राँग राबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. गेल्या मंगळवारीच न्यूयॉर्कच्या आकाशात सैन्य दलाच्या विमानांनी फ्लाय पास्ट केला. अमेरिकेतील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत. अमेरिकन हवाई दलाच्या थंडरबर्ड्स आणि नौदलाच्या ब्ल्यू एंजल्स विमानांनी उड्डाण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानवंदना दिली.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय हवाई दलcorona virusindian air force