coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, देशातील अनेक शहरे पुन्हा लॉकडाऊन झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:25 AM2020-07-13T11:25:02+5:302020-07-13T11:35:47+5:30

देशात आतापर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित सापडले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल २८ हजार ७०१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अनेक उपाय केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरात आणि काही राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढवली आहे.

उत्तर प्रदेश - Marathi News | उत्तर प्रदेश | Latest national Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये दर शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन लागू राहणार आहे.

मदुराई (तामिळनाडू) - Marathi News | मदुराई (तामिळनाडू) | Latest national Photos at Lokmat.com

तामिळनाडूमधील मदुराई शहरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. येथील लॉकडाऊन दोन दिवसांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता मदुराईमधील लॉकडाऊन १४ जुलै रोजी संपणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा लॉकडाऊन - Marathi News | जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा लॉकडाऊन | Latest national Photos at Lokmat.com

कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढल्याने येथे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार काश्मीरमधील श्रीनगरसह अन्य काही भागात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

पुणे 23 जुलैपर्यंत बंद - Marathi News | पुणे 23 जुलैपर्यंत बंद | Latest national Photos at Lokmat.com

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट अजूनही गंभीर बनलेले आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून, येथे 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यापैकी १८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. तर १९ जुलैपासून पुढे काही प्रमाणात सवलत दिली जाईल.

बंगळुरूमध्ये १४ जुलैपासून लॉकडाऊन - Marathi News | बंगळुरूमध्ये १४ जुलैपासून लॉकडाऊन | Latest national Photos at Lokmat.com

सुरूवातीला कोरोना नियंत्रणात असलेल्या कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येथे १४ ते २२ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांवर कडक निर्बंध असतील.