CoronaVirus News : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येणार, सरकारी समितीचा दावा By सायली शिर्के | Published: October 18, 2020 04:50 PM 2020-10-18T16:50:12+5:30 2020-10-18T17:16:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोना व्हायरसने आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने हा दावा केला आहे. देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरसने आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने हा दावा केला आहे.
समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच भारतात कोरोनाग्रस्ताची संख्या ही 10.6 मिलियन अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही असं देखील समितीने म्हटलं आहे.
भारतात सध्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहचली आहे. व्हायरसपासून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत असा सल्लाही देण्यात आला आहे.
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून या समितीचं गठण करण्यात आलं होतं. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत.
समितीने दिलेल्या माहितीनुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात 25 लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 1.14 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.
"गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या तसेच मृतांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र थंडीच्या दिवसात भारतात कोरोनाचा धोका कायम आहे."
"देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असला तरी नव्या रुग्णांच्या संख्येने चिंतेत भर पडत आहे" अशी माहिती कोविड एक्सपर्ट पॅनलचे चीफ डॉ. व्ही. के पॉल यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. तसेच देशामध्ये संशोधन देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक ठिकाणी यश आले आहे.
देशाचा रिकव्हरी रेट वाढून 88.03 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 1.53 टक्के आहे. गेल्या 24 तासांच देशात कोरोनाचे 61,871 नवे रुग्णा आढळून आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीचे लसीकरण याबाबत एका उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यादरम्यान मोदींनी सण उत्सवांच्या काळात निष्काळजीपणा टाळण्याचे आवाहने केले असून लोकांना मास्कच्या वापरणं, हात धुणं, सोशल डिस्टेंसिंग पाळण्याबाबत आवाहन केलं आहे.
मोदी यांनी लसीच्या वितरणावर भर देत संपूर्ण व्यवस्था ही आयटीवर आधारित असावी. आरोग्यसेवेसाठी दीर्घकाळ परिणामकारक ठरेल अशाप्रकारे या सिस्टीमला तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींनी देशातील भौगोलिक स्थिती आणि विविधता लक्षात घेता लस लवकरत लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती दिली आहे.
लॉजिस्टिक्स, डिलिव्हरी आणि एडमिनिस्ट्रेशमध्ये प्रत्येक पाऊल हे सावधगिरीने पडायला हवं. कोल्ड स्टोरेज चेन्स, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क, मॉनिटरिंग मॅकेनिज्म, एडवांस असेसमेंट आणि वायल्स तसंच मशिन्स यांबाबात आधीच योजना तयार असायला हव्यात.
कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये घट होत असली तर महामारी रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.