Coronavirus: Patanjali Covid-19 Medicine Coronil Launch from Baba Ramdev
Coronavirus: बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:48 PM2020-06-23T12:48:28+5:302020-06-23T12:53:10+5:30Join usJoin usNext योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली आयुर्वेदने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषध लॉन्च केले आहे. पंतजलीकडून हरिद्वार येथे दुपारी १२ वाजता दिव्य कोरोनिल टॅबलेट लॉन्च करण्यात आलं. योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले. हे औषध पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी बनवले आहे. 'कोरोनिल' चे क्लिनिकल कंट्रोल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे असा कंपनीचा दावा आहे. सध्या या औषधाची निर्मिती हरिद्वारची दिव्य फार्मेसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून केली जात आहे. नियामकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर औषधांच्या क्लिनिकल चाचण्या इंदूर आणि जयपूरमध्ये झाल्या. बालकृष्णांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगही केला पाहिजे आणि योग्य आहार घ्यावा. बाळकृष्ण यांनी सांगितले की, कोविड -१९ चा उद्रेक होताच शास्त्रज्ञांची टीम या कामात गुंतली होती. पहिल्यांदा स्टिमुलेशनद्वारे त्या कम्पाऊंड्स ओळखल्या गेल्या तेव्हा ते विषाणूंविरूद्ध लढतात आणि शरीरात त्याचा प्रसार रोखतात. पतंजली सीईओच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल 100 टक्के आहे. त्यांचा असा दावा आहे की, कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो. कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, हे औषध दिवसातून दोनदा - सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाऊ शकते असं बाळकृष्ण म्हणाले. अश्वगंधातील कोविड -१९ चे रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन (आरबीडी) शरीराच्या अँजिओटेन्सीन-कन्व्हर्टींग एंजाइमला (एसीई) मिळू देत नाही. म्हणजेच कोरोना मानवी शरीराच्या आरोग्य पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याच वेळी, गिलोग कोरोना संक्रमणास प्रतिबंध करते. तुळसी कोविड -१९ च्या आरएनएवर हल्ला करते आणि त्याचे वाढण्यास प्रतिबंध करते. मंगळवारपासून दिव्या कोरोनिल टॅबलेट बाजारात उपलब्ध होईल. कंपनी श्वसारी वटीच्या गोळ्याही विक्री करेल. श्वसरी रस जाड श्लेष्मा तयार होण्यास प्रतिबंधित करतो. तसेच फुस्फुसात होणारी सूज कमी करते. देशातील कोविड -१९ च्या उपचारासाठी प्रामुख्याने सिप्रेमी, फॅबिफ्लू आणि कोविफोर या तीन औषधांचा उपयोग केला जात आहे. सिप्रेमी आणि कोविफोर अँटीवायरल ड्रग रेमडेसिवीरचा सामान्य आवृत्ती आहेत. फॅबिफ्लू टॅब्लेट इन्फ्लूएन्झा औषध फविपिरावीरचा एक सामान्य प्रकार आहे. अलीकडेच या तीन औषधांना उपचारासाठी मान्यता मिळाली आहे. आता पतंजलीच्या 'कोरोनिल' टॅबलेटला कोरोना उपचारात वापरण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्यापतंजलीरामदेव बाबाcorona viruspatanjaliBaba Ramdev