Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 10:16 AM2020-04-04T10:16:44+5:302020-04-04T10:29:37+5:30

Coronavirus : देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत.

भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 2,567 वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगातील 200 हून देशात झाला आहे.

भारतात ही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत.

भारतातील रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे. कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी काही स्टेडियम आणि हॉटेल्सचं रुपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.

देशभरात अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू असून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच वाढत संसर्ग रोखण्यासाठी अनेक जागा सील करण्यात आली आहेत. हॉटेलपासून स्टेडियमपर्यत रूपांतरित करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरबद्दल जाणून घेऊया.

रेल्वे आपल्या एसी आणि नॉन-एसी कोचचे रुपांतर आता आयसोलेशन वार्डमध्ये करत आहे. यासाठी रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे.

देशभरात भारतीय सैन्य 6 क्वारंटाईन सेंटर चालवत आहेत. हिंडन, मानेसर, जैसलमेर, जोधपूर, मुंबई आणि चेन्नईमध्ये ही क्वारंटाईन सेंटर आहेत.

दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर जवाहरलाल नेहरू स्टेडियमचं रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशमधील कांशीराम कॉलनीतील एका रिकाम्या इमारतीचं रूपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. येथे इतर शहरातून आलेल्या रुग्णांना 14 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

बालासोर जिल्ह्यातील बिझनेस पार्कचं रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं असून तेथे 1000 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.

Lemon Tree, Red Fox आणि IBIS या दिल्लीतील तीन हॉटेलचं हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे

आसामच्या गुवाहाटीमधील सरूसजाई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे.

पाटणातील 12 हॉटेल्सही क्वारंटाईन सेंटरसाठी निश्चित करण्यात आली आहेत.