Coronavirus: 'बेटा, आज तुझ्यापेक्षा तुझ्या वडिलांची देशाला जास्त गरजय'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 06:00 PM2020-04-05T18:00:24+5:302020-04-05T18:15:19+5:30

आपल्या स्वत:च्याच दारात हा पोलीसवाला चक्क बादली उलटून त्यावर ताट ठेऊन जेवण करतोय. आपल्या वडिलांना दारातूनच त्यांची चिमुकली न्याहाळत आहे.

बाप-लेकीच्या नात्यात कोरोनामुळे झालेला दुरावा सांगणारा हा फोटो अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी शेअर केलाय. तर, सोशल मीडियावरही हा फोटो व्हायरल झालाय

IPS अधिकारी आणि हरयाणातील सायबर गुन्हे शाखेच प्रमुख नैन यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे, त्यासोबतत बेटा, आज तुझ्या वडिलांची गरज तुझ्यापेक्षा देशाला जास्त आहे, असे त्यांनी म्हटलंय.

एक पोलीसवाला चक्क रस्त्यावर, पेपरमध्ये भात-भाजी घेऊन खात आहे, एका कलाकाराने या फोटोसह बायको अन् त्यांच्या मुलीचं चित्र जोडलंय

अतिशय भावनिक असलेला हा फोटो, आयपीएस अधिकारी विक्रम कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केलाय. तसेच, त्या कलाकाराचंही कौतुक केलंय.

गुजरातमधील हा पोलीस अधिकारी नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन करतोय, त्यावेळी माझी आई आजारी आहे पण मी ड्युटी करतोय, असा संदेशही तो देतोय

कोरोनाकाळात पोलीसांमधील माणूसकीचं दर्शन घडलंय. पोलिसांनी कर्तव्य बजावताना मानवताही जपलीय. कित्येक उपाशी नागरिकांचं पोट भागवण्याचं काम केलंय.

माणूस तर माणूस पण प्राण्यांचीही काळजी घेतानाचा हा भावूक फोटो पाहून नक्कीच सॅल्यूट करावा वाटेल, या साहेबांना. चक्क कावळ्याला पाणी पाजत आहेेत

लॉकडाऊनमुळे रिक्षा नाही, वाहनं बंद आहेत, रस्ते मोकळे आहेत, अशातच बँकेत आपली पेन्शन काढण्यास चाललेल्या वृद्ध महिलेला पोलिसाने चक्क आपल्या हातात घेऊन बँक गाठली.

कोरोनाची वाढती दहशत लक्षात घेऊन, नागरिकांना आवाहन करुनही ते घराबाहेर येत आहेत. तर, पोलिसांनी अशी कोरोना बनण्याची शक्कल लढवली

हरयाणातील या पोलिसांनी गरजू आणि स्थलांतरीत नागरिकांचे वाडपी बनून काम केलं. भुकेल्यांना जेऊ घालण्याचं पुण्याचं काम केलं.

तेलंगणातील हे पोलीसही नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहेत, हातात फलक घेऊन नागरिकांना भावनिक मसेज त्या्ंनी दिलाय.