Coronavirus: Stay indoors, but don't spread rumors, sand artist sudarsan patnaik MMG
Coronavirus: तुम्ही घरातच बसा, पण बाहेर 'अफवा पसरवू नका' By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:56 PM2020-04-27T15:56:38+5:302020-04-27T16:12:13+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी नागरिक आपलं योगदान देत आहेत. भारतातही प्रत्येकजण या लढाईत योद्धा बनला आहे. सध्या प्रत्येकजण घरातच बसून आहे, तर घरातच बसण्याचं आवाहन तो करत आहे सॅन्ड आर्टींस्ट सुदर्शन पटनाईक हे आपल्या कलाकृतीतून कोरोनाविरुद्ध लढाईचा संदेश देशाला आणि जगातील नागरिकांना देत आहेत आपल्या वाळूतील कलाकारीने त्यांनी नेटीझन्सच्या मनावर राज्य मिळवलंय, कोरोनासोबतच जागतिक शिल्प दिनानिमित्तही त्यांनी काही कलाकृती शेअर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातून केलेल्या मार्ददर्शनपरही सुदर्शन यांनी कलाकृती निर्माण केलीय कोरोनाच्या लढाईत लढणाऱ्या डॉक्टर्संना रियल हिरो म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय, समुद्राच्या बाजून सुंदर कलाकृती उभारलीय कोरोनासोबतच, आपल्याला मलेरियापासूनही स्वत:चा बचाव करायचा असल्याचं त्यांनी आपल्या कलाकृतीतून सांगितलंय. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जन्मदिनी खास कलाकृती तयार करुन सचिनला शुभेच्छा दिल्या, सचिननेही या कलाकृतीचं कौतुक करत आभार मानले कोरोनाच्या लढ्यात जगातील सर्वच राष्ट्रांनी एकत्र येऊन लढायचं आहे, हे युद्ध आपणलाा एकतेच्या जोरावर जिंकायचंय जागतिक पृथ्वी दिनी सुदर्शन यांनी खास चित्र बनवले होते, या कलाकृती सोशल मीडियावर चांगल्याच हीट झाल्या आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्याचं आपलं शस्त्र म्हणजे केवळ आपण आपल्या घरी राहणं हेच होय. हा मेसेजही त्यांनी आपल्या वाळू कलाकृतीून दिलाय.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यावाळूट्विटरसचिन तेंडुलकरcorona virussandTwitterSachin Tendulkar