Coronavirus: खोकल्याच्या आवाजातूनही कोरोना समजणार; वैज्ञानिक उपकरण विकसित करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:13 PM2020-04-16T18:13:12+5:302020-04-16T18:19:45+5:30

कोरोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होत असून, त्याची लक्षणं सामान्यांच्या लगेचच लक्षात येत नाहीत. कोरोनाग्रस्ताची ओळख पटवण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेकदा प्रयोग केले.

प्रतिद्रव्यांच्या चाचण्या घेतल्या, पीसीआर चाचण्यासुद्धा घेतल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळात कोरोनाचा सर्वात मोठा धोका ओळखून बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थान(आयआयएससी) एक उपकरण विकसित करत आहे.

या उपकरणाच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजातूनही तो कोरोनाग्रस्त आहे की त्याला साधा खोकला आहे हे समजणार आहे.

अशा साधनांच्या सहाय्यानं डॉक्टरांच्या आरोग्याचा धोकासुद्धा कमी करता येऊ शकतो.

आयआयएससीच्या वैज्ञानिकांनी ध्वनी शास्त्रातून कोरोनाची ओळख पटवण्यासाठी उपकरण तयार करत आहे.

वैज्ञानिक तपासणीदरम्यान या बायोमार्करचे प्रमाण निश्चित करणे. एखाद्या व्यक्तीचा आवाज हा सामान्य खोकल्याचा आहे की कोरोनाच्या खोकल्याचा हा याचा शोध घेण्यात या उपकरणाची मदत होणार आहे.

आयआयएससीच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोना संसर्गाच्या घटनेत घट झाली आहे.

या आजारात श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो, तसेच खोकल्याचाही सामान्य खोकल्याच्या अधिक तीव्रतेनं होतो.

त्या तीव्र खोकल्याच्या आवाजातूनच शास्त्रज्ञ नवं उपकरण विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.