Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वाढणार, बचावासाठी आतापासून घ्या अशी खबरदारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:00 PM 2021-05-07T17:00:16+5:30 2021-05-07T17:12:45+5:30
Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती योग्य ठेवण्यासाठी काय करता येईल याची विचारणा पालकांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा सध्या देशाला बसला आहे. मात्र ही लाट ओसरण्यापूर्वीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. या सर्वामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती योग्य ठेवण्यासाठी काय करता येईल याची विचारणा पालकांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
आतापर्यंत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यातमध्ये आतापर्यंत ० ते १० वर्षांपर्यंतच्या १ लाख ४५ हजार ९३० मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दररोज ३०० ते ५०० मुलांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. तर राज्यात ११ ते २० वर्षांदरम्यानच्या ३ लाख २९ हजार ७०९ मुलांना आणि तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांची चिंता आधीपेक्षा अधिक वाढली आहे.
दरम्यान गोरखपूरमधील पूर्वांचल मल्टिस्पेशालिट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद नायक यांनी सांगितले की, ज्याप्रकारे कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वयस्कर आणि आजारी व्यक्ती सर्वाधिक शिकार झाले होते. तर दुसऱ्या लाटेत तरुणांना सर्वाधिक संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, अशी भीती विषाणुतज्ज्ञ आणि डॉक्टर व्यक्त करत आहेत.
डॉ. प्रमोद म्हणाले की, सध्याच्या प्रोटोकॉलमध्ये मुलांना लस दिली जात नाही आहे. तसेच त्यांच्यासाठी कुठलीही खास औषधे विकसित झालेली नाहीत. त्यामुळे लहान मुलांमधील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी त्यांच्यामधील रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. त्यासाठी मुलांना काही औषधे दिली जाऊ शकतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलांना तुम्ही एखा मर्यादेपर्यंत सप्लिमेंट्स देऊ शकता. यामध्ये १५ दिवसांसाठी झिंक, एका महिन्यासाठी मल्टी व्हिटॅमिन आणि एका महिन्यासाठी कॅल्शियमचा कोर्स दिला जाऊ शकतो. या सर्व बाबी इम्युनिटीला बुस्ट अप करता येऊ शकतो. मात्र व्हिटॅमिनच्या नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक वापर करावा असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
याशिवाय तुम्ही मुलांना कोरोनासंबंधीचे नियम पाळण्याची सवय लावली पाहिजे. घरात कुणाला लक्षणे दिसत असली किंवा नसली तरी लहान मुलांपासून सोशल डिस्टंसिंग पाळून राहा. याशिवाय मुलांना सर्दी आणि पोटाच्या विकारापासून वाचवा. कारण या आजारांमुळे रोगप्रतिकार शक्तीचे नुकसान होतो. त्यामुळे मुलांना अधिक थंड पाणी आणि तेलकट भोजन देऊ नका. त्याऐवजी आहारात डाळी, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.
बालरोगतज्ज्ञ सांगतात की, मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर मुलांमध्ये जुलाब, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, सुस्तावलेपणा अशी लक्षणे दिसली. तर त्वरित सतर्क व्हा. तसेच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांची कोरोना चाचणी अवश्य करा. त्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला आणि घ्या. मुलांची कोरोना चाचणीही करा. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना अँटी व्हायरल औषधे, स्टेरॉईड्स, अँटीबायोटिक आदि देणे नुकसानकारक ठरू शकते.
मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी खालील टिप्सचा वापर करा मुलांना बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ देऊ नका, मुलांना कुठल्याही कार्यक्रमात वा बाजारात घेऊन जाऊ नका, जर घरामध्ये कुणी आजारी असेल तर मुलांना एन-९५ मास्क वापरायला लावा, सध्याच्या वातावरणात मुलांना अन्य मुलांसोबत खेळू देऊ नका. त्यासाठी त्यांची समजूत काढा, मुलांचे मनोधैर्य उंचावेल याची काळजी घ्या. त्यांना कोरोनाची भीती घालू नका. मात्र शास्त्रीय पद्धतीने माहिती द्या