Coronavirus: Those who did not obey the law had to be beaten by police mac
Coronavirus: ए पकड! अत्यावश्यक काम नसतानाही घराबाहेर पडताय?; मग 'हे' फोटो नक्की पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:08 PM2020-03-25T12:08:40+5:302020-03-25T12:39:23+5:30Join usJoin usNext कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 21 दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री 8 वाजता केली. मात्र महाराष्ट्र, तेलंगणा यांच्यासह अन्य काही राज्यांनी याआधीच लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरी देखील नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन न करत घराबाहेर निघत असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे पोलिसांनी देखील त्यांना चांगलीच अद्दल घडवल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. पोलीस प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडण्याचं कारण विचारत होते. मात्र कोणतेही अत्यावश्यक काम नसताना लोक बाहेर पडले होते. त्यांना पोलिसांनी शिक्षा देऊन घरी जाण्यास सांगितले. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांनी दोन मित्रांना एकमेकांचे कान पकडून उठाबशा काढायला लावल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पोलिसांनी रस्त्यांवर फिरणाऱ्या तरूणांना भन्नाट शिक्षा दिली. संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या बाईकस्वारांना काठीने चांगली शिक्षा दिली. घरी राहा, कुटुंबांची काळजी असं आवाहन देखील पोलिस वारंवार करत होते. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 560 वर गेली असून, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 46 जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले 105 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये 41 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिसभारतcorona virusPoliceIndia