CoronaVirus Updates: देशात नव्या 42 हजार 982 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:41 AM2021-08-05T10:41:50+5:302021-08-05T10:45:36+5:30

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत 3 कोटी 09 लाख 74 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात गेल्या 24 तासांत 42 हजार 982 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 533 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 11 हजार 076 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 41 हजार 726 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 3 कोटी 09 लाख 74 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात बुधवारी 6126 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.69 टक्के झाले आहे.

राज्यात बुधवारी कोरोनामुळे 195 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 72 हजार 810 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सात जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. जालना (98) नंदूरबार (9), हिंगोली (65), अमरावती (82) वाशिम (76), गोंदिया (97), गडचिरोली (26) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 212 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नंदूरबार, परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,87,44,201 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,27,194 (12.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,47,681 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2928 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 263 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 438 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,13,161 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4430 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1595 दिवसांवर गेला आहे.