CoronaVirus Updates: देशात नव्या ४५ हजार ९५१ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:43 AM2021-06-30T10:43:25+5:302021-06-30T10:46:18+5:30

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत ६० हजार ७२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत ४५ हजार ९५१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०३ लाख ६२ हजार ८४८ वर पोहचली आहे. देशात सध्या ५ लाख ३७ हजार ०६४ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ६० हजार ७२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ९४ लाख २७ हजार ३३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ८१७ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ९८ हजार ४५४ वर पोहचली आहे.

राज्यात मंगळवारी एकूण ८ हजार ०८५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण ८ हजार ६२३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच गुरुवारी २३१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी २३१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ०९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ०९८ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात हा आकडा १६ हजार ४६७ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाण्यात एकूण १५ हजार ९३५ इतके रुग्ण आहेत.

मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ६१२ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ३५३, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ५९६, रत्नागिरीत ५ हजार ६१६, रायगडमध्ये ५ हजार ४५८, सिंधुदुर्गात ४ हजार ६७७, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ४९८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३४० इतकी आहे.