Coronavirus : कोरोनासोबत लढण्यासाठी सेलिब्रिटींनी दिले 8 लाख कोटी रूपये, भारतातून कुणी काय दिलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:23 PM2020-03-23T14:23:05+5:302020-03-23T14:44:20+5:30

फोर्ब्स मॅगझिननुसार, आतापर्यंत जगातल्या सेलिब्रिटींनी 8 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त दान दिलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक परेशान झाले आहेत. सरकारही आपल्या पद्धतीने या व्हायरससोबत लढण्याचे प्रयत्न करत आहे. मदतीसाठी आता अनेक श्रीमंत सेलिब्रिटी आणि अनेक संस्था समोर आल्या आहेत. कोरोनासोबत लढण्यासाठी यांनी कोट्यवधी रूपये दान दिले आहेत.

वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी तर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तब्बल 100 कोटी रूपये दान करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोना व्हायरसचं औषध तयार करण्याच्या मदतीसाठी 5 कोटी रूपये दान केलेत.

महिंद्रा अॅन्ड महिंद्रा ग्रुप चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मदतीसाठी पुढाकार घेत घोषणा केली की, ते त्यांचा संपूर्ण पगार दान करतील. तसेच त्यांनी इतरांनाही कोरोनाशी संबंधित फंडसाठी दान करण्याचं आवाहन केलं.

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी ट्विट करून सांगितले की, आपल्या जास्त प्रमाणात भारतीय इनोवेटर्स, संशोधकांची गरज आहे जे व्हेंटिलेटरची कमतरता आणि कोरोनावर योग्य उपाय शोधू शकतील. पेटीएमने यासाठी 5 कोटी रूपये दान केले आहे.

मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना वॅक्सिन तयार करण्यासाठी आणि आफ्रिका-आशियात उपचारासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी 750 कोटी रूपये देण्याची घोषणा केली. याआधी त्यांनी एक कोटी डॉलर दिलेले आहेत.

अलिबाबाचे जॅक मा यांनी 100 कोटी रूपये दिले आहेत. त्यांनी कोरोनाची वॅक्सिन विकसित करण्यासाठी 100 कोटी रूपये दिले आहेत. सोबतच त्यांनी अमेरिकेला 5 लाख टेस्टिंग किट आणि 10 लाख फेस मास्क पाठवले आहेत.

जगभरातील फुटबॉलर्सनी आतापर्यंत 50 कोटी रूपये दान केले आहेत. अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन फंड जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याद्वारे आतापर्यंत 300 कोटी रूपये दान करण्यात आले आहेत.

इटलीमध्ये सर्वात भयावह स्थिती आहे. इटलीतील 18 श्रीमंतांनी आतापर्यंत कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी 250 कोटी रूपयांपेक्षा जास्त दान दिलं आहे.

फॅशन लिजेंट अरमानीने मिलान आणि रोममधील हॉस्पिटल्सना 10 कोटींची मदत केली आहे.

हॉंगकॉंगमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती लि कांग शिंग यांनी वुहानमध्ये मेडिकल वर्कर्ससाठी 98 कोटी रूपये दान केले आहेत.

तसेच यूएस पॉस स्टार रिहानाने व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी 10 कोटी रूपये दान केले आहेत.