Cororn virus: 1500 bed 'isolation room' a week, amit deshmukh
Cororn virus : आठवडाभरात 1500 बेडचे 'विलगीकरण कक्ष' By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 08:17 PM2020-03-19T20:17:44+5:302020-03-19T20:21:29+5:30Join usJoin usNext amit deshmukh take meeting with medical official, and says about 1500 isolation ward महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात 700, मुंबईत 200 आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून 500 असे राज्यभरात एकूण 1 हजार 400 बेड असलेले 'विलगीकरण कक्ष' (आयसोलेशन वॉर्ड) येत्या आठवभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मंत्रालयात 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते. येत्या आठवड्याभरात कार्यान्वित होणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. या रुग्णांचा इतर रुग्णांशी संबंध येऊ नये यासाठी हा स्वतंत्र कक्ष असणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालय, मुंबईतील जे, जे.रुग्णालय आणि हाफकिन येथे येत्या 3 दिवसात कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठीची लॅब कार्यान्वित होणार आहे. औरंगाबाद, अकोला, धुळे, मिरज, लातूर आणि नागपूर या 6 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत्या 15 दिवसात लॅब कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. वैद्यकीय रुग्णालय/ महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालय, महाविद्यालय यांची स्वच्छता याला प्राधान्य द्या, असे अमित देशमुख यांनी सांगितले. रुग्णालय, महाविद्यालयाची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत अवगत करावे. येणाऱ्या काळात स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात यामध्ये नियमित हात धुणे, स्वच्छतेची काळजी याला प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालयात आणि महाविद्यालयात स्वच्छतेबाबतची संस्कृती रुजविण्यासाठी अधिष्ठाता यांनी विशेष प्रयत्न करावेत असे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केले. कोरोना व्हायरस कशामुळे होतो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, कोरोनाची नेमकी लक्षणे कोणती आहेत याबाबत महानगरपालिका/नगरपालिका यांच्या मदतीने जनजागृती मोहिम हाती घ्यावी. महाविद्यालयाच्या आवारात, वर्तमानपत्रात, आर्टवर्कच्या मदतीने, समाजमाध्यमांवरुन याबाबत जनजागृती करण्यासाठी अधिष्ठातांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले. आताचा काळ हा आपत्तीचा काळ आहे. आताच्या परिस्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करीत असलेले डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी जबाबदारीने काम करीत असून त्यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमित देशमुखcorona virusAmit Deshmukh